अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाला अतिक्रमणाचा विळखा. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, भाग (१)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाजवळ भिंतीलगत व पाचोरा, जामनेर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत एका इसमाने स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पत्र्याचे भलीमोठे टपरीवजा दुकान उभारले असल्याने या अतिक्रमित टपरीवजा दुकानामुळे भविष्यात खुप मोठी अडचण निर्माण होणार असून हे दुकान त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी अंबे वडगाव येथील सुज्ञ नागरिक व बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रम आहे. या आश्रमाची ओळख गल्लीपासून तर देहरादून, मुंबई, विदर्भ तसेच दिल्लीपर्यंत असल्याकारणाने मोठ्या संख्येने महानुभाव पंथाचे तसेच इतर धर्मीय भाविक भक्त या आश्रमात श्री. गुरुवर्य यळमकर मोठे बाबा व श्री. चक्रधर स्वामी व श्री. कृष्ण भगवानाच्या दर्शनासाठी साठी विशेष करुन पोथी पुजन व श्री. यळमकर बांबाजींच्या दर्शनासाठी आपापली वाहने घेऊन मोठ्या संख्येने येत असतात.
तसेच या आश्रमात श्री. भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने व वर्धापनदिन दिनानिमित्त या आश्रमात मोठा कार्यक्रम आयोजित व साजरा करण्यात येतो यावेळी या आश्रमात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात व येथे यात्रेनिमित्त विविध व्यवसायीक आपली दुकाने लावतात या कारणास्तव येथे मोठ्या संख्येने गर्दी होते. व समोरुनच पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील वाहतूक पाहता याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘महत्वाचे कारण म्हणजे’
या आश्रमात श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांचे वाचन व पठण केले जाते तसेच भाविक भक्त दररोज देवपूजा व नामस्मरण करण्यासाठी या मंदिरात येत असतात. भविष्यात हे दुकान सुरु झाल्यावर या दुकानातून कामानिमित्त ग्राहकांची होणारी वर्दळ, कामकाज करतांना होणारा आवाज या कारणांमुळे बऱ्याचशा अडचणी येणार आहेत. म्हणून हे टपरीवजा दुकान त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
दुसऱ्या भागात
स्व. मोठे बाबाजींच्या आजारपणाचा फायदा घेत बनावट मृत्यूपत्र करुन आश्रमाच्या स्थावर मालमत्तेच्या हेराफेरी ची पोलखोल सत्यजित न्यूज माध्यमातून लवकरच आपल्या समोर येणार.