दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२३

महाराष्ट्र राज्य गोशाळा आयोगाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य सहासंघाचे संयोजक डॉ. मा. श्री. सुनीलजी सुर्यवंशी व त्यांचे सहकारी यांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफना. गोशाळा संकुलला मार्गदर्शनपर सदिच्छा भेट दिली.‌ याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा व डॉ. बन्सीलाल जैन यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तदनंतर डॉ. सुनीलजी सुर्यवंशी व यांनी संपूर्ण गोशाळेत फिरुन सेंद्रिय खत उत्पादन, वनराई वृक्ष संगोपन कार्य, वृक्षतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी तसेच गोशाळेतील गायींचे शेण वाया न घालवता अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवरी उत्पादन, शेततळे व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, कृषी विद्यालयाची पाहणी केली व मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांनी संस्थेबद्दल सविस्तर माहिती देत दररोज गोशात गायींची वाढती संख्या लक्षात घेता निवारा शेड, चाऱ्यासाठी गव्हाण, पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यासाठी व इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची लागवड कमी झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाई तसेच अत्यल्प पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने गोशाळेला श्री. महाजन परिवारा सारख्या दानशूर संस्था व व्यक्तींनी मदत देत शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे अशी कळकळीची विनंती केली.

डॉ. मा. श्री. सुनीलजी यांनी गोशाळेची व्यवस्था व गोशाळेच्या माध्यमातून विविध उत्पादने पाहून आनंद व समाधान व्यक्त करत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत संस्था कशी स्वयंपूर्ण करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी राहुल बाफना, डॉ. बन्सीलालजी जैन, संस्थेचे कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.