दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळावा याकरिता पाचोरा येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश गौंड, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता ठाकुर, तालुका उपाध्यक्ष राजू आहिरे, शहराध्यक्ष शौकत टकारी, उपशहराध्यक्ष अनिल लोनारी, खजिनदार दिनेश धोबी यांच्यातर्फे पाचोरा तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच पाचोरा तालुक्याचे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून मा. श्री. कैलासजी चावडे यांना शासनामार्फत नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
दिव्यांग बांधवांना लवकरच अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देईल असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.