पाचोरा येथील २०० अग्रवाल समाज बांधवांनी केला अंबाऋषी महादेव मंदिरात रुद्राभिषेक.

निखिल मोर.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२२
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या पवित्र महिन्यात सर्वच देवदेवतांच्या विशेषता महादेवाची मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून जातात. मिरचीची बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या शिवणाजवळील आमसरी येथे अंबऋशी महादेव मंदिर आहे. खोलदरीत डोंगराच्या कपारीत महादेवाची पिंड आहे. डोंगरावरुण पडणारा आकर्षक धबधबा या निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे.
श्रावण महिन्यात हिरवाईने नटलेला हा परिसर भक्तांना मोहित करतो.
महादेवाच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते, मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथांमध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो, त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो. विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळविण्याची उत्तम संधी आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून
पाचोरा अग्रवाल समाजाच्या वतीने २०० समाज बांधवांनी आमसरी येथे अंबऋशी महादेव मंदिरात महाराज महाविर गौड यांनी केले रूद्र अभिषेक केले. यावेळी अग्रवाल समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला