तपासी अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध खोटा अहवाल बनवल्याचा कुऱ्हाड बुद्रुक येथील सरपंच उदेसिंग वंजारी यांचा आरोप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२२
सद्यस्थितीत गल्ली ते दिल्ली सगळीकडे सत्ता भोगण्यासाठी सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. काही राजकारण्यांना निवडणूकीचे डोहाळे लागले आहेत. तर दुसरीकडे सत्तेवर आहेत त्यांच्या हातून सत्ता हिसकावून घेण्यासाठी अविश्वास ठराव आणून तसेच खोटेनाटे आरोप करुन सत्तापालट करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन खेळी खेळत आहेत. हा प्रकार ग्रामपंचायत स्तरावर जास्त दिसून येत आहे. कारण राज्याच्या राजकारणाचा कणा ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या व सहकार खात्याने मजबूत होत असतो ही वस्तुस्थिती आहे.
अशीच खेळी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या राजकारणात दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की २०२१ मध्ये कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचयतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवारांनी बहुमत मिळवून ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध केले व दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी शिवसेनेचे उदेसिंग वंजारी हे सरपंच पदावर विराजमान झाले.
मात्र हे वर्चस्व भाजपचे गटाला सहन झाले नाही. व जेव्हापासून मी सरपंच पदावर विराजमान झालो तेव्हा पासून भाजपच्या पराभूत गटाने माझ्या विरोधात कुरघोड्या करत अर्जफाटे करण्यास सुरुवात केली. हे विरोधक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अविश्वास आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले अशी माहिती सरपंच उदेसिंग वंजारी यांनी सत्यजित न्यूज कडे कथन केली.
तसेच विरोधकांनी आपले कटकारस्थान सुरुच ठेवले असून मी ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक १५ या जागेवर ५९५ चौरस फूट अतिक्रमण करुन घरकुल बांधले असून या घरकुलाचे बांधकाम करतांना १०×१५ फुट ओटा व पायऱ्यांचे बांधकाम तसेच उत्तर बाजूस १५×१५ फुटाचे पत्री कुडाचे बेकायदेशीरपणे बांधकाम करत सरपंच पदाचा गैरवापर करत जास्तीचे बांधकाम करुन अतिक्रमण केले असल्याची खोटी तक्रार करून मला अपात्र करून सरपंच पदावरून हटवण्यासाठी कुऱ्हाड बुद्रुक येथील राजु सखाराम राठोड व राजु सुरा राठोड यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केलेली असल्याने तशी चौकशी करण्यात आली असून यात राजकीय दबावामुळे मोजमापात हेराफेरी करण्यात आली असल्याचा आरोप सरपंच उदेसिंग वंजारी यांनी केला आहे.
कारण या तक्रारी अर्जाची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी धस साहेब व ग्रामसेवक एस. पी. पाटील यांनी सरपंच उदेसिंग वंजारी यांच्या घराचे मोजमाप करुन पाचोरा पंचायत समितीकडे अहवाल सादर केला असून या अहवालात सरपंच उदेसिंग वंजारी यांचे घरकुलाचे बांधकाम २३×१६ असल्याचे नमूद केले असून
या अहवालाची प्रत अधिक माहितीसाठी सरपंच उदेसिंग वंजारी यांना दिली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर सरपंच उदेसिंग वंजारी यांना संशय आल्यामुळे त्यांनी खाजगी इंजिनिअर कडून घरकुलाचे मोजमाप करुन वस्तुस्थिती पडताळून पाहीली सरपंच उदेसिंग वंजारी यांनी घरकुलाचे बांधकाम करतांना नियमानुसार तंतोतंत केले असल्याने त्यांनी खाजगी इंजिनिअर आणून घरकुल बांधकामांचे मोजमाप केले असता ते बांधकाम २२×१६ इतकेच आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कुणाच्यातरी दाबाखाली किंवा पैसे घेऊन मोजमापात तफावत करुन माला पदावरून हटवण्यासाठी तक्रारदारांशी हातमिळवणी केली असल्याचा संशय व्यक्त करत मी वरिष्ठांपर्यंत दाद मागणार असल्याचे सांगितले.
सरपंच उदेसिंग वंजारी~
मी सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून मला विरोधी पार्टीकडून सतत त्रास दिला जात असून अर्जफाटे करुन खोटे आरोप करत आहेत. या कारणास्तव गावात विकासकामे करतांना अडचणी येत आहेत. माला होणाऱ्या त्रासाबद्दल व खोट्या तक्रारीबाबत तसेच तपासी अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल सादर केल्या बाबत मी महाराष्ट्र राज्याचे महसूल, ग्रामविकासमंत्री नामदार मा. श्री. अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे विस्तार अधिकारी धस साहेब व ग्रामसेवक एस. पी. पाटील यांनी खोटा अहवाल तयार केल्याबद्दल तक्रार केलेली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन माझ्या घरकुलाचे मोजमाप करावे मी दोषी आढळल्यास जागेवरच राजीनामा देईल मात्र मी निर्दोष सिद्ध झाल्यास खोट्या तक्रारी व खोटा अहवाल सादर करणारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच उद्या दिनांक १२ मे २०२२ गुरुवर रोजी जिल्हास्तरावर संबंधित तक्रारीची चौकशी होणार असल्याचे सांगत मी कागदपत्रे व पुराव्यानिशी माझे मत मांडणार असून तपासणी अधिकारी मला नक्कीच न्याय देतील अशी आशा व्यक्त केली आहे.