लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदारांची आदरांजली

दिलीप जैन. ( पाचोरा )
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.लेवा भवन येथील सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व समाज पदाधिकारी नतमस्तक झाले.
महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे,बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि नाभिक महामंडळाचे किशोर सूर्यवंशी,शिंपी समाजाचे नेते आणि बारा बलुतेदार महानगर जिल्हाध्यक्ष मुकुंद मेटकर,प्रदेश नेते ईश्वर मोरे,साहेबराव कुमावत, सरचिटणीस चंद्रशेखर कापडे, युवक जिल्हाध्यक्ष हर्षल सोनवणे,महिला जिल्हाध्यक्षा भारती कुमावत,महानगर उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे,लेवा युवा महासंघाचे कार्याध्यक्ष अमोल कोल्हे,जिल्हा उपाध्यक्ष सखाराम मोरे,संघटक सचिव विजय शिंदे,युवक उपाध्यक्ष सागर सपके,जिल्हा संघटक प्रभाकर खर्चे,माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे,शंकर निंबाळकर, नाभिक समाज ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरनारे,जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार गवळी,राज्य संघटक मोहनराव साळवी, राकेश वाघ,महानगर संघटक किरण भामरे, छगन सपके, दीपक मांडोळे, सुमित बोदडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.