पिंपळगाव हरेश्वर येथे भाजपा तर्फे सेवा हे संघटन या सदराखाली वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांचा सत्कार संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२१
माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा हे संघटन या सदराखाली पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच गावागावात फिरुन कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करुन अनेकांना जीवदान देणारे वैद्यकीय अधिकारी तसेच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, आशा स्वयंमसेविका,मदतनीस या सगळ्यांचा सत्काराच कार्यक्रम नुकताच पार पडला.
या सत्काराचे कार्यक्रमाचे प्रसंगी पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.मोहत जोहरे व सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचा पिंपळगाव शिंदाड गटाचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.मधुकर भाऊ काटे,मा.श्री.डॉ.शांतीलालजी तेली, मा.श्री. भारतीय जनता पार्टीचे पिंपळगाव हरेश्वरचे शहराध्यक्ष विनोद महाजन, पाचोरा तालुका सरचिटणीस युवा मोर्चा भाजपाचे विश्वनाथ परेश भाऊ यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कडूबा पाटील डॉक्टर सुनील माधवराव माळी योगेश हटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,