कु.किरण चौधरी हिची उत्तुंग भरारी, उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी केला जाहीर सत्कार.
सुमीत पाटील.(वावडदा)
दिनांक~१२/०१/२०२२
शिरसोली येथील श्री.हेमंतकुमार(राजुभाऊ)चौधरी यांची कन्या कु.किरण हेमंतकुमार चौधरी हिने बीई मॅकेनिकल इंजिनीयरिंग GRE परीक्षेत ३५० गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिची एम.एस(मास्टर ऑफ सायन्स) साठी इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली आहे.
यानिमित्त ग्रामस्थ व आप्तेष्ट, नातेवाईकांतर्फे तिचा जाहीर सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम शिरसोली येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आप्तेष्ठ,नातेवाईक,परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु.किरणचा सत्कार केला व तिला भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कु.किरणची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाली ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत सत्कार करतेवेळी मराठा -कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ,गौरी उद्योग समूह, वावडदा चे चेअरमन तथा जळगाव खान्देश कुणबी मराठा वधुवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केले. व कु.किरण ला शुभेच्छा दिल्या.
या वेळी सिरसोली येथील पंचायत समिती माजी सभापती नंदु पाटील. सरपंच बापु रावसाहेब पाटील. माजी सरपंच अनिल पाटील. माजी सरपंच प्रनय माळी. हाॅटेल धनश्री चे संचालक निलेश भाऊ बारी. प्रमोद मिस्तरी. आंबा सोनार. प्रकाश जगताप. सुभाष सोनगिरे . विवेकानंद इग्लिश मिडीयम स्कुल चे विजय पाटील. वाणी सर व बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.