विविध सवलती मिळाव्यात म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पाचोरा तहसीलदार यांना निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
अपंग बांधवांना विविध सवलती मिळत नसल्याने या सवलती मिळाव्यात म्हणून पाचोरा प्रहार अपंग सेनेच्या माध्यमातून पाचोराचे मा. तहसीलदार साहेब यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या निवेदनात दिव्यांग, विधवा, परिता, पटस्पोट, वयोवृध्द असे घटकातील पाचोरा शहरातील व पाचोरा तालुक्यातील वरील समाज घटकातील लोकांना खालील प्रमाणे स्वलती मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली.
यात शिधापत्रिका अत्योदय किंवा प्रा.कुलाचे लाभार्थी यांना लाभ देण्यात यावा, वरील सर्व घटकातील लोकांना घरकुल योजनेचा प्राधान्याने व विना अट घरकुल देण्यात यावे, दिव्यांग कल्याणकारी हक्काचा ५% निधी त्वरीत वाटप करण्यात यावा, शासनाच्या जी.आर. नुसार दिव्यांग व्यक्तींना घर पट्टी करामध्ये मध्ये ५०% टक्के सुट मिळावी, समाजकल्याण विभागामार्फत बिज भांडवलाचा लाभ मिळत नसल्याने तो त्वरित मिळावा, दिव्यांगासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजना राबवून, पाचोरा नगर पालिकेतून समान निधी वाटप करण्यात यावा, पाचोरा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील शॉपिंग गाळ्यांचे वाटप करतांना शॉपिंग ॲक्टनुसार दिव्यांगाचे हक्काचे ५% आरक्षण अमलात आणून गाळे वाटप करण्यात यावेत, श्रावणबाळ व संजय गांधी योजनेचे लाभ वेळेवर मिळावा तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ त्वरीत मिळावा इत्यादी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.