पहुर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ चे दोन्ही बाजूला लावलेल्या झाडांची नासधूस केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०६/२०२२
पहुर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ या मार्गावर बोदवड रेल्वे स्टेशन गेट पासून ते इच्छापूर बसस्थानकावर व्यक्त ३३ किलोमीटर कामाचा ठेका गुजरात राज्यातील अदिपूर कच्छ येथील सरस्वती कंट्रक्शन कंपनीने घेतलेला होता. या कंपनीचे कामकाज जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील श्री. भास्कर तुकाराम काटे हे सुपरवायझर पदावर कार्यरत असल्याने ते कंपनीचे कामकाज पाहात होते.
सदरचे काम करत असतांना ठेक्यातील ठरलेल्या अटी व शर्ती प्रमाणे कंपनीने संपुर्ण महामार्गाचे दोन्ही बाजूस झाडांची लागवड केलेली होती. सदर मार्गावर चॅनेज नंबर ५९६०० ते ५९८५० डाव्या बाजुचे अंदाज ४ किलोमीटर अंतरावर कंपनीकडून लावण्यात आलेली झाडे व्यवस्थीतपणे लावण्यात व जोपासत आली होती. परंतु भारत ब्रॉडबँन्ड नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार श्री. भारत पाटील (मो.नं.९५८९३१०३९९) यांनी जे.सी.बी. च्या सहाय्याने अंदाजे मार्च ते एप्रिल २०२२ च्या कालावधीत रात्रीच्या वेळी महामार्ग प्राधिकरण अथवा त्या कामाचे ठेकेदार असलेल्या सरस्वती कंस्ट्रक्शन कंपनीची व एम.एस.आर.डी.सी. कंपनी नाशिक यापैकी व कंपनीच्या कोणत्याही इंजिनियर अथवा सुपरवाईजर यांना विश्वासात न घेता व कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनाधिकृतपणे झाडे तोडली असल्याने त्या एकुण क्षेत्रात लावलेली सुमारे ५ लाख रुपये किंमतीचीजातीची वृक्ष (झाडे) व त्या वृक्षांना (झाडांना) वाढण्यासाठी कंपनीने वेळोवेळी केलेल्या पाणीपुरवठ्याचा खर्च अंदाजे २ लाख रुपये असे सरस्वती कनस्ट्रक्शन कंपनीने एकुण ७ लाखाचे व पर्यावरणाचे ६५ लाख रुपये असे नुकसानीस भारत ब्रॉडब्रेड नेटवर्क लिमिटेड कंपनीचे ठेकेदार श्री. भारत पाटील यांचेसह कामावरील इंजिनिअर निलेश सर तसेच प्रताप व त्यांचे सुपरवायझर हेच जबाबदार असल्याने त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणेसाठी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली असून आपले स्तरावर तशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात येवून मे. सरस्वती कंस्ट्रक्शन कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, तसेच झाडांचे केलेले नुकसान ज्या ठिकाणी झाडे तोडली त्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्याचे आदेश करण्यात यावेत अशी मागणी तक्रारी अर्जात केली असून निवेदनाच्या प्रती सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, व अधिक माहितीसाठी, मे. कार्यकारी अभियंता सो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय नाशिक, म. सामाजिक वनिकरण अधिकारी, सो, सामाजिक वनिकरण विभाग, मुक्ताईनगर,
तालुका मुक्ताईनगर, जि. जळगांव, मे. वनपरिक्षेत्र अधिकारी सो, प्रादेशिक वन विभाग, मुक्ताईनगर, जि. जळगांव, मे. तहसिलदार साो, तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगांव यांच्याकडे पाठवल्या आहेत.
Scanned with CamScanner