वरसाडे येथे बंजारा समाजबांधवांच्या धुलीवंदन कार्यक्रमात मधुकर भाऊ काटेंनी घेतला ठेका.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२२
आपल्या भारतीय संस्कृतीत होळी या सणाला खुप महत्त्व असून हा सण आपल्याकडे बंजारा समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. या दिवशी तांडा वस्तीतील सर्व समाजबांधव सकाळपासून ढोलकीच्या तालावर नाचत पारंपारिक होळी गिते म्हणून मनमुराद आनंद लुटतात. तसेच हा आनंद लुटतांंना दारुचाही आस्वाद घेतला जातो. मग सुरु होतो तो भांगडा मग या उत्सवात सर्वच समाजबांधव सामील होऊन एकमेकांना होळीव धुलीवंदनच्या शुभेच्छा देतात.
असाच होलिका उत्सव पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा.येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ कटे यांनी वरसाडे प्र.पा. येथे भेट देऊन ग्रामस्थांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बंजारा बांधवांसोबत डफाच्या तालावर पावली घेत रंग खेळत मनमुराद आंनद लुटला.
यावेळी वरसाडे प्र.पा.चे सरपंच, उपसरपंच, सदस्य बंटी राठोड, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच विजू भाऊ, अमोल राठोड, ज्ञानेश्वर जाधव, पोलीस पाटील राजाराम राठोड, अर्जुन राठोड, राम किसन राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, लालचंद राठोड, तुकडूदास चव्हाण, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. राठोड सर. गावाचे नाईक चारू सर व समस्त ग्रामस्थ मंडळी सामिल झाले होते.