तेली समाज महिला मंडळातर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे तेली समाज महिला मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव (जयंती) मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रथम पिंपळगाव हरेश्वर गावातून शिवकन्या रॅली काढण्यात येऊन नंतर मातोश्री नगर येथे सभामंडपात प्रमुख अतिथी वर्धा येथील महाराष्ट्र कमिटीच्या वरीष्ठ सदस्या डॉ. सौ.रत्नाताई चौधरी (नगरे), औरंगाबाद येथे चार्टर्ड अकाउंटंन प्रियंका ढाकरे यांच्या हस्ते श्री. सरस्वती माता, संत जगनाडे महाराज, महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सौ. प्राजक्ता नैनाव यांच्या मंडळाने स्वागतगीत म्हणून आलेल्या अतिथींचे मनपूर्वक स्वागत केले.
तदनंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यात तेली समाजातील चैताली बिंदवाल या चार्टर अकाउंटंन पहिल्या महिला तसेच प्रियंका ढाकरे या पहिल्या जी.एस.टी. अधिकारी बनून तेली समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला यासाठी त्यांनी केलेला संघर्ष व खडतर प्रवास कथन करत तरुण, तरुणींना मोलाचे मार्गदर्शन केले व मनात जिद्द, चिकाटी सोबतच वाचन व आभ्यास केल्यास महिलाही उच्च पदावर विराजमान होऊ शकतात हे पटवून दिले.
नंतर शिवचरित्राचे वाचन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनिवर आधारित भाषण व विविध भाषेतील कला सादर केल्या. असे विविध ३५ प्रकारचे कलागुणांनांचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
नंतर शिव चरित्रगीत ,सामाजिक उद्बोधक भाषणआणि विविध कला गुणांनी युक्त सांस्कृतिक कार्यक्रम असे मिळून एकूण 35 प्रकारचे कार्यक्रम पार पडले. नंतर वरिस्ट कमिटीचे अध्यक्ष मा. दादासो शांतीलाल तेली यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत आणि सत्कार केला सोबतच सर्व कमिटी सोबत समाजाची दिनदर्शिका वर्धा साठी सुपूर्त करण्यात आली. संजय झेरवाल सर यांनी अतिथींना कोरोना योद्धा म्हणून शॉल ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन महिला कमिटी अध्यक्ष सौ वंदना झेरवाल ,उपाध्यक्ष तुलसा माहुरे, सचिव ज्योती नैनाव आणि संपूर्ण महिला मंडळ सदस्य यांनी केले होते त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला याबाबत त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. झेरवाल सर आणि तेली समाज पुरुष कमिटी आणि गावकरी यांनी मेहनत घेतली.