जामनेर तालुक्याचे आमदार मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी येथ मुतखडा तपासणी शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२२
जामनेर तालुक्याचे लाडके आमदार तसेच माजी मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी येथे मुतखडा तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लाभ मिळाला असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्याचे लाडके आमदार तसेच माजी मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा तसेच शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे सदस्य, शेंदुर्णी नगरीचे समस्त नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने पारस मंगल कार्यालयात या मोफत मुतखडा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मुतखडा तपासणी शिबिरासाठी वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील. (अस्तिरोग तज्ञ) तसेच डॉ. प्रशांत महाजन. एम.बी.बी.एस.डी.एन.एस.(जनरलसर्जरी) डी.एन.बी. (युरोलॉजिस्ट) यांनी शेंदुर्णी गावातील व पंचक्रोशीतील नागरीकंची तपासणी करुन योग्य तो सल्ला देत मुतखडा व्याधीने त्रस गरजु रुग्णांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या शिबिर यशस्वीतेसाठी शेंदुर्णी नगरीतील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगर, उप नगराध्यक्ष व ग्रामस्थांनी कथक परिश्रम घेतले.