चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात ६ मुस्लिम जोडप्यांचा सामुहिक विवाह गौसिया ग्रुप तर्फे संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२१
चाळीसगाव येथील हजरत अली चौक येथील गौसिया ग्रुप तर्फे सहा जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी राजकीय नेते व कुणाचीही मदद न घेता फक्त मुस्लिम समाजातील काही लोकांनी हा विवाह सोहळा पार पाडला.
या विवाह सोहळ्यात वधूवरांना पलंग, गादी, ब्लॅणकेट, कपाट, रॅक, पंचवीस प्रकारचे संसार उपयोगी भांडे देण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आयोजक गौसिया ग्रुपचे सल्लाउद्दिन मुजावर,राजू खान,मोहीन खान,जहीर अली,जमील रंगरेज,शेख अलीम यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पदाधिकारी व नगरपालिकाचे अनेक नगरसेवक यांनी उपस्थिती देऊन त्यांनी गौसिया ग्रुपचे अभिनंदन केले. गौसिया ग्रुपने यावेळी सांगितले येणाऱ्या काळात आम्ही अशेच गोरगरीब मुलं-मुलींचे सामूहिक विवाह पार पाडू जेणे करून गरीब कुटुंबातील आईवडिलांवर कर्जाचा बोजा येणार नाही. कमी खर्चात लग्न पार पडतील गौसिया ग्रुपचे सर्वत्र आणि पाचोरा फोकस न्यूज सचिन पाटील स्टार 18 न्यूज शेख जावीद झोन न्यूज मराठी निलेश पाटील. आरोग्य दूत नरसिंग भुरे साहेब पत्रकार यांनी ज्याचा विवाह झाले यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. नंतर सगळ्यांनी पिर मुसाबाबांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.