अबकी बार, आर या पार, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हरीभाऊ पाटील यांचा उपोषणाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०६/२०२२
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मागील एक वर्षापासून मनमानी कारभार सुरू असून रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार न करणे, नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी रुग्णालयात हजर नसणे, यज्ञ वैद्यकीय अधिकारी किंवा बालरोगतज्ज्ञ हजार नसतांना परिचारिका किंवा इतर कर्मच्याऱ्यांकडून रुग्णांवर उपचार करणे, बाळांतपणासाठी आलेल्या महिलांसाठी वैद्यकीय अधिकारी हजार नसणे तसेच बाळांतपण व इतर उपचार करुन घेण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करणे अशा एक ना अनेक तक्रारीवरून पाचोरा ग्रामीण रुग्णालय सद्यस्थितीत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याबाबत काही समाजसेवक व सुज्ञ नागरिकांनी वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई किंवा साधी चौकशी होत नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अरेरावी व मनमानी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.
अशाच वादग्रस्त वातावरणात पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात १० मे २०२२ मंगळवार रोजी एक महिला बाळांतपणासाठी आली होती. महिलेचे बाळांतपण झाल्यानंतर महिलेने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला. जन्मलेले बाळ सुदृढ व गुटगुटीत होते. परंतु एका परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचार पद्धतीमुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या आई वडिलांनी संबंधित परिचारिकेच्या विरोधात केला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
तसेच या घटनेबाबत संबंधित परिचारिकेने आमच्या नवजात शिशू (बाळावर) उपचार करतांना आमच्या बाळाला छातीवर अमानुषपणे जोरजोरात चापटा मारल्यामुळे बाळाच्या छातीवरील काळवंडलेली त्वचा दाखवून वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे परिचारिकेने केलेल्या चुकीच्या उपचाराबाबत रितसर कैफियत मांडलीव विचारणा केली असता वैद्यकीय अधिकारी यांनी नवजात बालकाच्या आई, वडीलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कोणतीही दखल न घेता फरिचारिकेने केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीवर पांघरूण घालुन परिचारिकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मयत बालकाच्या आई व वडीलांनी केला होता.
ही माहिती मिळताच पाचोरा येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी लगेचच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत या घटनेबाबत वरिष्ठ पातळी पर्यत पुराव्यानिशी कागदपत्रे तयार करून तक्रार दाखल केली होती. तरीही संबंधित विभागाकडून कुठल्याही स्वरूपाची दखल घेतली गेली नाही. तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात बाळांतपणासाठी येणाऱ्या गरजू महिलांची अडवणूक करून पैसेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या तरीही वैद्यकीय अधिकारी याबाबत कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित घटनेतील नवजात शिशूच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा म्हणून सरतेशेवटी हरीभाऊ पाटील यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला व उद्या दिनांक १३ जून २०२२ सोमवार पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती हरिभाऊ पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.