भोकरी(वरखेडीच्या) रेल्वे फाटकाजवळ अपघाताची मालिका सुरुच, दररोज होताहेत अनेक जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळ असलेल्या भोकरी येथे जामनेर पाचोरा रेल्वे फाटक आहे. याच रस्त्यावर जामनेर पाचोरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. परंतु मागील दोन महिन्यापासून या रेल्वे फाटकाच्या आसपास व रेल्वे रुळाजवळ मोठमोठे खड्डे पडले असून रेल्वेचे रूळ (धावपट्टी) वर निघाल्याने व या रेल्वे रुळाच्या दोघे बाजूने मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने चालवतांना खूप अडचणीचे होत आहे.
नेमके आता पावसाळी वातावरण असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यानंतर या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन या खड्ड्यात पडत असून दुचाकी वाहन धारकांना या खड्ड्याचे ठिकाणी पडून बरेचसे अपघात झाले असून दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे.
आत्तापर्यंत रेल्वे रुळाजवळील खड्ड्यात अपघात होऊन वाहनधारकांना मोठ्या प्रमाणातदुखापत झाली असून आज पर्यंत या ठिकाणी तीन लोकांचे हात फॅक्चर झाले असल्याचे येथील रहिवासी सांगतात. तसेच बऱ्याच महिला व पुरुष जबर जखमी झाले असल्याचे समजते. तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या लहान चार चाकी वाहनांचे तसेच मालवाहू ट्रक व इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी त्रस्त वाहनधारक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली जोर आहे.
(हे खड्डे भरणार कोण)
नेमके हे खड्डे कोणी बुजवावेत यावरून वाद सुरू असल्याचे समजते. कारण हे खड्डे जामनेर पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यावर पडले असून ते नेमके रेल्वे फाटका जवळील रेल्वे रुळाजवळ पडले आहेत. या कारणामुळे सुज्ञ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे फोन करुन कळविले असता या खड्ड्यांची जबाबदारी आमची नाही ते रेल्वेच्या हद्दीत येतात असे सांगितले जाते.
तर दुसरीकडे जामनेर येथील रेल्वे प्रशासनाकडे काही सुज्ञ नागरिकांनी फोन करून रेल्वे विभागाला कळवल्यावर त्यांच्या मते आमची रेल्वे बंद झाली असून आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही असे न शोभणारी उत्तर मिळते. असे जनमानसात चर्चेत आहे.
म्हणून आता हे खड्डे कोणी भरावे याची जबाबदारी कोण स्वीकारेल हा मोठा प्रश्न उभा राहिला असून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना या ठिकाणाहून जातायेतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तरी हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा याठिकाणी एखाद्यावेळी मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.