दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील तसेच पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आज रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृंदावन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी, रक्त केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सामान्य जनतेला रुग्नांना लाभ मिळावा या उदात्त हेतूने महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सकाळी ११ वाजता हॉस्पिटलच्या प्रांगणात कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष तथा झेप इंडियाचे संपादक (पत्रकार) डॉ. योगेश पाटील तसेच वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पाटील व डॉ. निळकंठ पाटील या मान्यवरांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आले. या प्रसंगी पाचोरा, भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात एकुण ७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच एकुण २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. योगेश पाटील यांनी स्त्रीरोग डॉ. विजय पाटील व आर्थो तज्ञ डॉ. निळकंठ पाटील यांनी वृंदावन हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील आठ ते दहा वर्षांपासून पाचोरा, भडगाव शहरासह तालुक्यातील गोंदेगाव, सोयगाव, वरठाण, वाडी, बोनोटी, इत्यादी गावातील रुग्णांना शासकीय योजनेतून तसेच अल्पदरात चांगली सेवा देत असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले अध्यक्षीय भाषणानंतर वृंदावन हॉस्पिटलतर्फे उफस्थितांचे आभार मानले हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वृंदावन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या प्रसंगी वृंदावन हॉस्पिटलचे (ही.ई.ओ.) विकासजी लोहार, (पी.आर.ओ.) किशोर जी शिनकर, न्यूज झेप इंडियाचे संजय पाटील, मधुकर सैंदाने, स्वयंसेवी रक्त केंद्र जळगावचे टेक्निकल सुपर वायझर माधवराव गोळवलकर, सहाय्यक श्रीकांत मुंडले, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. अतुल पाटील, वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयात तपासणी करुन घेण्यासाठी आलेले रुग्ण व रक्तदान करण्यासाठी आलेले रकतदाते व त्यांचे सहकारी, नातेवाईक, पत्रकर उपस्थित होते.