पाचोरा बसस्थानक मागील भिम नगर व बिस्मिल्ला नगर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित. नागरिक त्रस्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२२
पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरातील मागील बाजूस असलेल्या भिम नगर व बिस्मिल्ला नगर परिसरातील विद्युत पुरवठा काल दिनांक २७ जून सोमवार पाऊस सुरु झाला व अचानकपणे शॉटसर्कीटने मोठा आवाज झाला व तेव्हापासून रात्री अंदाजे साडेनऊ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पुरवठ्यात अचानक झालेल्या बिघाडामुळे या परिसरातील काही रहिवाशांनी चार्जिंगला लावलेले भ्रमणध्वनी, टिव्ही संच, हवेचे पंखे यांच्यात बिघाड झाला आहे. तसेच यामुळे या परिसरातील जनता हैराण झाली असून यात लहान मुले, वृध्द व जेष्ठ नागरिकांना उकाडा सहन करावा लागत असून या परिसरातील नागरिकांना भ्रमणध्वनी रिचार्ज करण्यासाठी अडचणी येत असल्याने विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे संपर्क साधून समस्या मांडण्यासाठी अडचणी येत आहेत.
याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी भिम नगर व बिस्मिल्ला नगर परिसरात कार्यरत असलेले विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वता भेटून तसेच दुसरीकडे जाऊन भ्रमणध्वनीवरून समस्या मांडून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. परंतु संबंधित विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी समाधानकारक उत्तर न देता ट्रान्सफॉर्मर जळगाव येथुन येत आहे. ट्रान्सफॉर्मर आल्यावर बघू, करु अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे या परिसरातील नागरिक सांगत असून विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरी या परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून जलदगतीने कामकाज करुन त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी जोर धरत आहे.