गरुड महाविद्यालयात एकदिवसीय रोजगार संधी कार्यशाळा संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२२
नेहरू युवा केंद्र जळगाव व धी. शेंदूर्णी सेकं.एज्यु. को-ऑप सो.संचलित अप्पासाहेब रघुनाथराव भावराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदूर्णीच्या के.आय.ई.डी.सी.केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय रोजगार निर्मिती व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा.श्री. वासुदेव आर.पाटील. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी त्यांनी रोजगाराच्या संधीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे गरजेचे आहे व त्यासाठी अश्या स्वरूपाच्या कार्यशाळेची गरज विषद केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. उदघाटकीय मनोगतात सदर कार्यशाळेसाठी विषयतज्ञ व साधन व्यक्ती म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांनी “उद्योजकता बीजांकुरण व विकास” ह्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उद्योजक कसा घडतो? तसेच उद्योग कसा सुरू करावा व विकासीत करावा याविषयी सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी “पदवी नंतरच्या रोजगाराच्या संधी”या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी एम.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षेत असलेल्या करियरच्या संधीं विषयी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात संगणकशास्त्र विभागातील प्रा.निलेश बारी यांनी “आय.टी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आय.टी.क्षेत्रातील होणारे बदल व निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील एकूण १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी के.आय.ई.डी.केंद्र समन्वयक प्रा.डॉ.योगिता चौधरी,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील व निलेश बारी,महेंद्र घोंगडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन स्वप्नील जाधव व आभार तरुण बारी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.