सीमा भोई यांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०९/२०२१
भडगाव येथील शेतमजूर मा.श्री. नाना भोई यांची सुकन्या कु.सीमा भोई हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वेळ पडल्यास आईवडीलांचे सोबत बाजारात खाद्यपदार्थ विक्रीसाठी हातभार लावत चिकाटीने आभ्यास करत सरळ सेवा परिक्षा देऊन त्यात यश संपादन करुन अधिकारी होईलच हे आपल्या आईवडीलांचे स्वप्न पुर्ण करेलच असे सांगितले. खरच कु.सीमा हिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे गावकरी व मित्रमंडळी सांगतात.
कु.सीमा भोई हिला आज दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी भारतीय राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे, अभिनेता चिन्मय उदगीर व मिस इंडिया सौ.संगीता खैरनार यांच्या हस्ते स्वयंसिद्ध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या यशामागे तीचा माऊ भागवत भोई याचाही सिंहाचा वाटा आहे. कारण कु.सीमा हिला सतत पाठबळ व आर्थिक बळ देवून भागवत याने तिचे मनोधैर्य वाढवले असे सीमा सांगते.
या यशाबद्दल भोई समाज व पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे.