डांभुर्णी येथे दिनांक २७ नोव्हेंबर रविवार रोजी भव्य निरंकारी सत्संग.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२२

पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथे सदगुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असिम कृपेने २२ साव्या वार्षिक निरंकारी सत्संग समारोहाच्या निमित्ताने परम आदरणीय महात्मा हिरालालजी पाटील (झोनल इंचार्ज धुळे झोन) यांच्या पावन उपस्थितीत दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विशाल निरंकारी सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहुन सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन व विनंती आयोजकांनी तर्फे करण्यात आली आहे.

तसेच याठिकाणी संत्संग समाप्ती नंतर ब्रम्हज्ञान व लंगरप्रसादीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सेवादल महापुरूषांनी वर्दिमध्ये येऊन सेवेचा आस्वाद घ्यावा हि नम्र विनंती समस्त ग्रामस्त मंडळी डांभुर्णी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

सुचना ~ सत्संग वेळेवर सुरू होईल) असे मुखी महेश शिवाजी वाघ संत निरंकारी मंडळ ब्राँच, पाचोरा राजु महात्मा यांनी सुचित केले असून या कार्यक्रमाबद्दल कुणालाही काही माहिती हवी असल्यास किंवा कुणाला सेवेचा काही लाभ घ्यावयाचा असल्यास पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती. मुखी महेशजी वाघ भ्रमणध्वनी क्रमांक ९६३७४६२५१३ गोकुळ महात्मा भ्रमणध्वनी क्रमांक ९०४९२५६८०५.