वाडीवऱ्हे जवळील गुरुनानक ढाबा परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२२

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गावाजवळील गुरुनानक ढाबा परिसरात अन्न व औषध प्रशासनाने दोन कंटेनरचा पाठलाग करुन दिड कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला असल्याने गुटखा माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक २९ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी सापळा रचून भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कंटेनरचा पाठलाग करत वाडीवऱ्हे गावाजवळील गुरुनानक ढाब्याजवळ अडवून झाडाझडती घेतली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.

या कारवाईत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असलेल्या आर.जे. ०६ जी.बी. ५२०३ या क्रमांकाच्या कंटेनर मधून एस.एच.के. प्रिमियम या कंपनीच्या गुटख्याचा १,५०,५४,००० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला तर दुसऱ्या आर.जे. ०९ जी.बी. ०४७२ या क्रमांकाच्या कंटेनर मधून एस.एच.के. प्रिमियम सफर व फोर.के.स्टार. या कंपनीच्या ४५,३३,००० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत दोन कंटेनर मधून एकुण १,९५,८७,००० किंमतीच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा व अंदाजे तीस लाख रुपये किंमतीचे दोन कंटेनर जप्त करण्यात आले असून कंटेनर व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वाडीवऱ्हे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला भा.द.वी. कलम ३२८, २७२, २७३, १८८ व अन्न सुरक्षा मानले कायद्याअंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मा. मंत्री महोदय श्री. संजयजी राठोड, प्रशासनाचे आयुक्त मा. अभिमन्यू काळे, सह आयुक्त (दक्षता) श्री. समाधान पवार, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्री. गणेश परळीकर, सहायक आयुक्त (दक्षता ) श्री. उल्हास इंगवले, सहायक आयुक्त श्री. उदय लोहकरे, श्री. मनिष सानप यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गोपाल कासार व श्री. अमित रासकर व श्री. अविनाश दाभाडे यांनी केली असून पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या