कुसुंब्यात २३ नोव्हेंबरला दिगंबर जैन मुनिश्रींचे मोरपिसांची पिच्छी परिवर्तन कार्यक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१
कुसुंबा येथे गेले चार महिन्यापासून चातुर्मास स्थित असलेले परम तपस्वी चर्या चक्रवती दिगंबर आचार्य सुनील सागरजी महामुनी श्री. यांचे परमशिष्य प.पू. श्री १०८ सुदेह सागरजी मुनीश्रींचा नगरात मोठ्या उल्लासित मंगलमय वातावरणात मानवी जीवनाचे पावित्र्य फुलविणारा असा वर्षायोग संपन्न झाला.
चातुर्मास संपन्नतेनंतर त्यागी वृंद आप-आपले मोराच्या पिसाची पिच्छी वर्षातून एकदा परिवर्तन करीत असतात. जुनी पिंछी श्रावकास देऊन नवी पिंछी श्रावक देतात ही क्रिया दिनांक २३ नोव्हेंबर मंगळवार रोजी नगरातील प्राचीन जैन क्षेत्रावर शासनाच्या नियमानुसार सकाळी आठ वाजता कार्यक्रम रुपाने संपन्न होणार असल्याची माहिती चातुर्मास समितीचे आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व खान्देश जैन पत्रकार विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा) यांनी दिली आहे.
महामस्तकाभिषेक नंतर पिंछीची शोभायात्रा काढण्यात येईल त्यानंतर प्रवचन, पिंछी परिवर्तनाचा कार्यक्रमानंतर चातूर्मास प्रारंभ वेळी कुसुंबा गौरव असलेले प.पू. १०८ समाधी सागर जी महामुनीश्रींना मुनी दीक्षा घेण्यास ४१ वर्ष पूर्ण झाली त्या निमित्त ४१ स्वस्तिक चिन्हाचे नाणे समवेत विविध मुनीश्रींचे तसेच तीर्थंकर यांच्या नावाचे ११ कळस विधिवत स्थापना करण्यात आले होते.
त्यांचेही याप्रसंगी ज्यांनी कळस स्थापित केले होते. त्यांना वितरित करण्यात येईल पूज्यश्री सुदेह सागर जी महाराजांची पिंछी श्रावकास पिंछीचे अतिशय महत्त्व असल्यामुळे ती पिंछी (जुनी) कोणास मिळते याकडे भाविकांचे लक्ष वेधले असून काही मुनी संघांच्या नियमाप्रमाणे जो श्रावक अधिकाधिक संयमाचे नियम पालन करतील त्यांना पूज्यश्रींचे पिंछी घेण्याचे सौभाग्य प्राप्त होते.
तर काही संघाचे नियमाप्रमाणे पिंछीची बोली होते व त्या पैशाचा समाज उपयोगी मंदिरासाठी वापर करत असतात. आपल्या वागणुकीत कठोरता असते. परंतु भावनेत मृदुता असते. जैन मुनि मोराच्या पिसांची जी पिंछी सोबत ठेवता ती अहिंसेच्या मृदु भावनेचे प्रतीक आहे. या पिच्छीने अहिंसेचे पालन केले जाते व हिंसेचा परिहार केला जातो.
उठतांना, बसतांना, ठेवतांना, उचलतांना प्रत्येक क्रिया करतांना जे जीवांची रक्षा करण्याचे भान ठेवता व या जीवांना वाचविण्यासाठी या पिंछीने परिमार्जन परीलेखन करतात जेणेकरून कोणत्याही जीवाला कष्ट होऊ नये. मोराचे पंख (पिसे) अत्यंत नाजूक असतात, हलके असतात, ते घाम धूळ पाणी यांना ग्रहण करत नाही मोराचे पीस डोळ्यात गेल्यावर देखील अश्रू येत नाहीत. असे अनेक गुणांचे मोरांचे पिस असतात व ते आनंदाच्या क्षणी स्वतःहून विसर्जित केलेले असतात.
त्यामुळे त्यात कोणतीही हिंसा होत नाही. म्हणून या मोरपिसाची पिच्छी बनविले जाते तिला संयमउपकरण म्हणतात. तिच्यामुळे प्राण्यात संयमाचे पालन होते. कोमल ह्रदय बनविल्या शिवाय पिंछी घेतली जात नाही. साधूंचे बाह्य चिन्ह पिंछी आहे त्या पिंछी शिवाय त्यागी वृंद सात पावले देखील पुढे जाऊ शकत नाही. या सोबतच मुनीश्रींना शुद्धीचे उपकरण कमंडल व स्वाध्याय साठी शास्त्र दान भाविकांकडून केले जाते. परंतु आतील (अंतःकरणातील) चिन्ह समता वितराग विज्ञान आहे.
अतिशय क्षेत्राचे विश्वस्त महेंद्र हिरालाल जैन, मयुर रिखब जैन, वालचंद रतनलाल जैन, पारस नवणीतलाल जैन, पंकज नगीनदास जैन, राहुल सुंदरलाल जैन, स्वप्नील महेंद्र जैन, रोशन रविंद्र जैन, दीपक रविंद्र जैन, प्रतिक उल्हास जैन, गौरव उल्हास जैन, ओम राजेंद्र जैन, परम शितल जैन, वेदांत विपुल जैन, सम्यक राजेंद्र जैन, सतिष वसंतिलाल जैन, चंदू शांतीलाल जैन, विपुल अशोक जैन, वर्धमान सुरेश जैन, अतुल हेमचंद जैन, प्रदीप माणकलाल जैन, किरण प्रेमचंद जैन, महावीर सुभाष जैन, प्रमोद पानाचंद जैन, राजेंद्र स्वरूपचंद जैन, मोहित जैन, अभय पन्नालाल जैन, अशोक जैन, आदी सह पार्श्वनाथ सेवा समिती व पद्मावती युवा मंच यांनी सयोजन केले.