सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध.

भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध.

By Satyajeet News
May 20, 2021
201
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२१

गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शन चा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत, तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सूरु आहे, आज गृह विलगीकरणात असलेल्या बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटर ची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई च्या वतिने २५ ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सदरची हे मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. या फौंडेशनच्या वतीने निशुल्क दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही ५ लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे .

ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (९४२३७७४३४६), सुधीर पाटील (९८२३३६२३३०), उदय महाजन (९४२२७७६७०८), अनिल जोशी (९४३२५९४४८७), नितीन चोपडा (९४२३४८९८२४), अमर चौधरी (९३७२४०९४६८) डॉ. प्रदीप ठाकरे (९४२२७७५९०६) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

*भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन-* जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी १९८२ मध्ये सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी म्हणून जैन चॅरिटीज् ची स्थापना केली. ही संस्था आता कालांतराने भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन अशी नोंदणीकृत झाली. समाजाला प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्म, पर्यावरण आणि जीवनावश्यक बाबी इत्यादी करीता मदतीची आवश्यकता असते. ही संस्था विविध जाती धर्माच्या गरजू, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना निरपेक्ष भावनेने मदत करीत असते. दातृत्वाचा हा वसा मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्याकडून पुढच्या पिढीस मिळाला असून या संस्थेची व्याप्ती व कार्य वाढलेले आहे.

*विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि. मुंबई-* विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि. ही मुंबईस्थित पॉलीमर क्षेत्रातील जागतिक पातळीवरची मोठी कंपनी आहे. ही कंपनी गत ४० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असून प्लास्टिक व केमिकल्सच्या वितरण व विपणण क्षेत्रात अग्रेसर आहे. ११० देश अर्थात जगभरात कंपनीची विक्री व्यवस्था आहे. जग भरात सुमारे ५० कार्यालये या कंपनीचे आहेत. ही कंपनी सीएसआर निधीतून म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) विविध सामाजिक लोककल्याणकारी कार्य करीत असते. विनमार व जैन इरिगेशन कंपनी आता कोविड-१९ च्या आव्हानात्मक परिस्थितीत मिळून मदत करण्यासाठी कटीबद्ध झालेली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 43
Previous Article

ब्रेक द चेन (लॉकडाऊनच्या) कालावधीतही वरखेडी येथे ...

Next Article

पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना राजवड येथे शिधा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    मराठा आरक्षण ही शासनाची मेहरबानी नसून, मराठा समाज बांधवांचा तो हक्क आहे. सौ. वैशालीताई सुर्यवंशी.

    November 1, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सिल्लोड शहरात व सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महावितरणचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा.

    December 23, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    आंदोलन,आंदोलन ,आंदोलन, भडगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज प्रतिनिधी यांची बैठक संपन्न ...

    November 25, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अरुणा प्रकल्पग्रस्तांची , मानवी हक्क आयोगाने घेतली दखल.

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    समाजसेवक सुमित पंडित व सौ. पुजा पंडित यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार प्रदान.

    March 27, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर चिखलाच्या पायघड्या.

  • प्रासंगिक

    एका बाजूला लाडक्या बहिणींचा वेगळाच थाट दुसरीकडे मात्र बॅंकांमध्ये खडखडाट पैशाअभावी जीवनावश्यक कामे रखडली.

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज