मेहताब सिंग राठोड यांना बंजारा भुषण पुरस्कार प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२३
पाचोरा येथील वसंतराव नाईक कर्मचारी संघटना शाखेतर्फे पाचोरा येथील रामदेव लॉन्स येथे बंजारा संघटनेचे संस्थापक मा. श्री. अमर भाऊ राठोड, जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाळु भाऊ धाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा पुरस्कार सोहळ्यचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बंजारा समाजासाठी सतत झटणारे अधिकारी, कर्मचारी व व्यापाऱ्यांना बंजारा भुषण पुरस्कार देऊन मोठ्या उत्साहात सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात मा. श्री. मेहताब सिंग राठोड यांना बंजारा भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बजारा समाजातील इतर अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व समाजासाठी सतत झटणाऱ्या इतर मान्यवरांना ही विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाप्रतीनीधी राजेंद्र राठोड, तालुकाध्यक्ष वासुदेव चव्हाण, सुभाष पवार, अशोक चव्हाण, अनिल राठोड, गोपाल नाईक, कैलास राठोड, अशोक पवार, यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. श्री. संजय राठोड, सुत्रसंचलन विशाल राठोड व राजु राठोड व आभार प्रदर्शन वासुदेव चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व बंजारा बांधवांनी विशेष सहकार्य केले.