पाचोरा तालुक्यात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. ४२० बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा सुज्ञ नागरिकांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०९/२०२३
पाचोरा तालुक्यात गावागावातील गावात ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा व माणूसकीचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून काही बोगस डॉक्टरांनी मिळेल त्या ठिकाणी आपले दवाखाने मोठ्या दिमाखात थाटले असून बिनधास्तपणे औषधांचा वापर करुन आपण खुप शिकलेलो आहोत अशी शेखी मिरवत दवाखान्यासमोर कोणताही बोर्ड न लावता तर काही ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा कुठेही वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण न घेता पैशाच्या जोरावर थेट बाहेर राज्यातील विशेष करुन बेंगलोर येथुन युनानी व वेगवेगळे वैद्यकीय व्यावसायाचे प्रमाणपत्र मिळवून आपण खुप मोठे डॉक्टर आहोत अश्या पध्दतीने थोडक्यात सांगायचे झाले तर (मुन्नाभाई एम. बी. बी. एस. ४२०) अश्या फार्मात दवाखाने चालवत असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे सुज्ञ व जानकार लोकांमधून चर्चीले जात आहे.
या चर्चेनुसार आम्ही थेट पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावाला भेटी देऊन दवाखान्यात जाऊन पाहिले असता गावागावात बिनदिक्कतपणे मुन्नाभाई एम. बी. बी. एस. यांनी आपले दवाखाना थाटले आहेत. विशेष म्हणजे काही दवाखान्यासमोर कोणताही फलक लावण्यात आलेला नसल्याचे दिसून आले. यामुळे संबंधित डॉक्टरांनी होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी किंवा कोणते शिक्षण घेतले आहे समजून येत नाही असे असले तरी संबंधित मुन्नाभाई एम. बी. बी. एस. यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याच्या सोयीनुसार रुग्णांसाठी तीन ते चार पलंग व स्वतासाठी टेबल, खुर्ची तसेच रुग्णांना बसण्याची व्यवस्था केली आहे.
हे मुन्नाभाई एवढ्यावरच थांबले नसून ते बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करत असून साधी, साधी लक्षणे जाणवली तरी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी नको ते वर्णन करुन रुग्णांच्या मनात भय निर्माण करुन गरज नसतांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, हकनाक रक्त, लघवी, थुंकी तपासणी करायला लावून संबंधित लॅबोरेटरी संचालकांकडून कमीशन लाटणे तसेच वारेमाप औषधे लिहून देत औषधी विक्रेत्यांकडून कमीशन लाटणे गरज नसतांना सलाईन लावून रुग्णांना लुटण्यासाठीचा प्रकार सर्रासपणे करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पाचोरा तालुक्यातील अशा बोगस डॉक्टरांवर हा बोगस डॉक्टरांनची चौकशी करुन रुग्णांच्या जिवाशी खेळला जाणारा जीवघेणा खेळ त्वरित थांबण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. कारण या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एखाद्या रुग्णांच्या जीवावर बेतू शकते अशी भिती सत्यजित न्यूज कडे बोलुन व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन सत्यजित न्यूज लवकरच पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून लवकरच खुलासा घेणार असून संबंधित डॉक्टर बोगस असल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहे.