हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी पाचोरा येथे मुस्लिम समाजाने राबवली स्वाक्षरी मोहीम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२३

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या विषयाकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा येथील फईम शेख यांनी मुस्लिम बांधवांना एकत्रित करत एक समिती गठीत करुन स्वाक्षरी मोहीम राबवून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात पाचोरा शहरातील नुर मस्जिद (आठवडे बाजार), मच्छी बाजार, कुर्बान नगर, आयशा मस्जिद (जारगाव) या ठिकाणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे मुस्लिम समाज बांधवांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याप्रसंगी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे फईम शेख, अमजद पठाण, वहाब बागवान, रहेमान तडवी, सईद शेख, इसराईल खान, अजहर टकारी, अली, मोसिन पठाण, रिजवान शेख, कैफ रंगरेज, अख्तर अली, इम्रान शेख, शिरु बागवान, निसार शेख, सुलतान अली यांच्यासह सुमारे १२०० समाज बांधवांनी स्वाक्षरी करुन मुस्लिम समाजाला साजिद कुरेशी, अजहर शेख, आरक्षण मिळावे यासाठी पाठींबा नासिर शेख, फरीद रंगरेज, मुजाहिद दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या