ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेसाठी, माळी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार ७६ हजार पोस्टकार्ड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१०/२०२३

मागणी करुनही ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना केली जात नसल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा जळगांव व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने आदरणीय नामदार मा. छगनरावजी भुजबळ साहेबांच्या ७६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ७६ हजार पोस्टकार्ड पाठवून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी अमळनेर येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता घेण्यात येणाऱ्या ओबीसी आरक्षण निर्धार मेळाव्यात करण्यात येणार आहे.

तरी नामदार माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७६ हजार पोस्टकार्ड पाठविण्याच्या मोहिमेत सकल माळी समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शालिग्राम मालकर व जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. भिमराव महाजन यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या