गुमनाम है कोई, बदनाम है कोई , परेशान है पोलिस भाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावात गावठीदारु निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच सट्टा, पत्ता, जुगाराचे अड्डे राजरोसपणे आजही सुरु आहेत. विशेष म्हणजे कुऱ्हाड येथुन अंबे वडगाव, अंबे वडगाव तांडा, वडगाव जोगे, सार्वे, म्हसास, लोहारा व इतर गावांना लिटरचे कॅन चे कॅन भरुन दुचाकीवरून पोहचवले जातात या कारणांमुळे कुऱ्हाड येथील गावठी दारू निर्मिती व विक्री ही दहा खेड्यांमध्ये डोकेदुखी बनली असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन व इतर पोलिस यंत्रणा वारंवार धाडसत्र राबवून सुध्दा कुऱ्हाड येथील गावठी दारू निर्मिती व विक्री थांबत नसल्याचे दिसून येते. तसेच दारुबंदी साठी स्वतंत्र विभाग असूनही या गावात अजूनही दारुबंदी विभागाने कोणतीही कारवाई केली नसून हे खाते अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.