दिव्यांग सेनेचा जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना २० दिवसाचा इशारा
दिलीप जैन. ( पाचोरा )
एकच ध्यास दिव्यांगाचा विकास हे ध्येय हाती घेऊन झटत असलेले महाराष्ट्र सचिव भरत जाधव, अक्षय महाजन सर जळगाव जिल्हा दिव्यांगसेना जिल्हा अध्यक्ष, शेख शकील जिल्हा दिव्यांग सेना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २६ /१०/२०२० सोमवार रोजी जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना वीस दिवसात जर तुम्ही दिव्यांग कल्याणकारी पाच टक्के निधी जर मंजूर केला नाही तर आम्ही सर्व दिव्यांग बांधव तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा महापालिकेला देण्यात आला. आतापर्यंत २०१६ ते २०२० या वर्षभरामध्ये महापालिकेला दिव्यांग सेनेच्या माध्यमातून सहा वेळा निवेदन आणि स्मरणपत्र वारंवार देण्यात आले. तरीदेखील महापालिकेला जाग आली नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या पदरी निराशाच पडली. शासन निर्णयानुसार महापालिकेच्या स्व: उत्पन्नातून दिव्यांग कल्याणकारी पाच टक्के निधी चा वापर करण्यात येतो. तरीदेखील महापालिकेने कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही. दिव्यांग बांधवांना ५० टक्के घरपट्टी व नळपट्टी सूट करण्यात यावी, दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ, बचत गटांना अर्थ सहाय्य देण्यात यावी अशा अनेक प्रकारच्या मागण्या चे निवेदन महानगरपालिकेला देण्यात आल्या. त्या वेळेस हितेश तायडे दिव्यांग सेना जळगाव जिल्हा सचिव, प्रदीप चव्हाण संघटक प्रमुख जळगाव जिल्हा, ज्ञानेश्वर पाटील सहसचिव जळगाव जिल्हा, नितीन सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ता, भीमराव मस्के मूकबधिर जळगाव शहर उपाध्यक्ष, तसेच दिव्यांग सेना पदाधिकारी हे उपस्थित होते.