खिलाडी वृत्ती जोपासून वाघ परिवाराशी एकनिष्ठ असलेले नगरसेवक हाजी बशीर दादा बागवान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२१
पाचोरा शहरातील सर्वांचे परिचित असलेले नाव श्री. हाजी दादा बशीरदादा म्हणजे एक साधे रहाणे व उच्च विचार असलेले व्यक्तीमत्व, गेल्या पन्नास वर्षापासून पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे एक छोटीसा पान दुकानाचा व्यवसाय असून तो व्यवसाय परंपरेनुसार आजही चालवत आहेत. त्यांना क्रीडा क्षेत्रात कुस्ती, कबड्डी व पटांगणात खेळल्याजाणारे अनेक आवडते खेळ होते. म्हणून त्यांनी त्यांच्या मित्र मंडळींना सोबत घेऊन क्रीडा क्रांती मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी जळगाव जिल्ह्यात त्यांचे क्रीडा क्षेत्रातील मित्र स्वर्गीय बबन बाहेती यांच्या सोबत जिल्ह्यात कबड्डी व कुस्ती मध्ये यशस्वी कामगिरी केली. कामगिरी यशाच्या जोरावर अनेक पारितोषिके मिळवली.
क्रीडा मंडळत जिल्हा चॅम्पियन पद मिळवले. त्यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू घडवले. त्यांना राजकारणात आजही माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांचे विश्वासू कार्यकर्ते होते म्हणून ओळखले जाते. कारण श्री.बशीर दादा यांनी आप्पा साहेबांची साथ कधीच सोडली नाही. आप्पासाहेब सत्तेत असो वा नसोत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात त्यांनी स्व.आप्पासाहेबांची साथ कधीच सोडली नाही. व कधीच त्यांच्यापासून दूर झाले नाहीत.
बशीर दादा बागवान यांनी कधीच कुठल्या पदाची आशा ठेवलेले नव्हती. निस्वार्थ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती माननीय आप्पासाहेब पी.टी.सी.चे अध्यक्ष असतांना त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन पि.टी.सी. संस्थेचे संचालक केले. त्यांना त्यांच्या काळात शिवाजीनगर मधून नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले होते. परंतु त्यावेळेस त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता. तरीसुद्धा बशीर दादा खचून न जाता आपला व्यवसाय सांभाळून आप्पा साहेबांसोबत कायम राहिले.
पाचोरा तालुक्यातील बापूसाहेब के.एम.पाटील. मंत्री असतांना श्री.बशीर दादा यांनी ऑल इंडिया मुशायराचा कार्यक्रम आठवडे बाजारात आयोजित केला होता. त्यावेळेस त्यांनी आप्पा साहेबांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केले होते. स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या निधनानंतर श्री.बशीर दादा यांनी स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या घराण्याशी असलेला दोस्तीचा वारसा कायम ठेवत माजी आमदार श्री. दिलीप वाघ व पि.टी.सी. चेअरमन संजय नाना वाघ यांची साथ सोडली नाही. वाघ परिवाराचा कुठलाही पक्ष असो सत्ता असो वा नसो पण बशीर दादा यांनी वाघ परिवाराशी असलेले नाते कायम ठेवून आजही ते वाघ परिवारासोबतच असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
अप्पासाहेबांच्या काळात अपूर्ण राहिलेले नगरसेवक पदाचे स्वप्न श्री. दिलीपभाऊ वाघ व श्री संजीव दादा वाघ यांनी त्यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करुन पूर्ण केले व वाघ परिवाराने दिलेला पाळला. तसेच माननीय माजी पंतप्रधान श्री.चंद्रशेखरजी पाचोरा आले असतांना माननीय श्री स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी समाजवादीच जनता दल पाचोरा शहराध्यक्ष मा. श्री. बशीर दादा यांना मान दिला होता.
तसेच जळगाव येथे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तेव्हा या स्पर्धांचे नेतृत्व श्री.बशीर दादा बागवान यांनी केले होते. त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. गुलाबराव देवकर यांच्याहस्ते गिरणा गौरव पुरस्कार देण्यात आला होता. तसेच माजी केंद्रीय मंत्री श्री.रामविलास पासवानजी हे पाचोरा शहरात आले असतांना त्यांचे स्वागत श्री.बशीर दादा यांना करण्याची संधी मिळाली होती. माननीय श्री. स्वर्गीय आप्पा साहेब यांचे पाचोरा शहरात नगरपालिका जिनमध्ये आपले छोटेसे कार्यालय होते. त्या कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत आप्पासाहेब थांबत असत व सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवत असत.
त्या काळात स्वर्गीय आप्पासाहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून श्री.बशीर दादा बागवान यांची ओळख होती.म्हणून महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे कबड्डी असोशियनचे अध्यक्ष असतांना पाचोरा येथे आले होते तेव्हा त्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन श्री.बशीर दादा यांनी पार पाडले होते. श्री.बशीर दादा यांच्याकडे आजही जिल्हा क्रिडा कबड्डीचे जिल्हा उपाध्यक्ष पद आहे. आजही वाघ परिवार व बागवान परिवार यांच्या अतुट नात्याची गाठ कायम असून वाघ परिवार आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. श्री.बशीर दादा म्हणजे साधे सरळ व्यक्तिमत्त्व मनमिळाऊ स्वभाव प्रत्येकाच्या हाकेला हाक देणारे तसेच सुखदखात धाऊन जाणारे असल्याकारणाने तालुक्यातील येणारा व्यक्ती बशीर दादा यांना भेटल्याशिवाय जात नाही. व प्रत्येक येणाराला बशीर दादा यांची भेट घेतल्याशिवाय पाचोरा वारी पुर्ण होत नाही. असे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
अनिल आबा येवले.
पाचोरा.