जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. जयंतदादा पाटील यांच्या समोर आमदार मा.श्री. किशोर पाटील. यांनी मांडले शेतकरी बांधवांच्या हिताचे प्रश्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२१
मा.ना.श्री.जयंतदादा पाटील साहेब, मंत्री-जलसंपदा म.रा.मंत्रालय,मुंबई,यांच्या समवेत आज झालेल्या बैठकीत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी, खालील प्रमाणे, शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वाचा व जिव्हाळ्याच्या विषयी सविस्तर चर्चा केली
बैठकितील आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मांडलेले मुद्दे.
१.पाचोरा-भडगाव तालुक्यातील गिरणा प्रकल्पाच्या कालव्याची नूतनीकरणासाठी कामांना खास बाब म्हणून मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.
२.तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग,जळगाव विभागातील पाचोरा-भडगाव तालुक्यातील नवीन तसेच
प्रलंबित कामे मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा.(हिवरा प्रकल्प व बहुळा प्रकल्प वरील कामे)
३. जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१७-१८ कामांना सुधारित प्रशाकीय मान्यता मिळावी. (जुवार्डी कच्चा बंधारा, जुवार्डी मायनर, पाझर तलाव, गुढे पाझर तलाव,पथराड ल.पा.तलाव)
४. बहुळा प्रकल्प ता.पाचोरा व जलाशयास “कृष्णासागर ” नामकरण होंऊन पर्यटन स्थळ कार्यक्रमाअंर्तगत समावेश करून परिसर सुशोभीकरण करणे बाबत.
५. वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाचे सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी पारंपरिक मुख्य कालवा व त्यावरील वितरण व्यवस्था प्रणाली ऐवजी उपसासिंचन प्रणाली अनुसरून बंदिस्त पाईपलाईन व्दारे करावयाच्या प्रस्तावास मान्यता मिळावी.
६. मौजे, जुवार्डी, आडळसे,पथराड, ता.भडगाव येथील शेतकऱ्यांच्या अंतिम निवाडा झालेल्या भूसंपादनाची रक्कम मिळावी.
इत्यादी वरीलप्रमाणे विषयाचे आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री , आदरणीय,मा.ना.श्री.जयंतपाटील साहेब यांना, आमदार, मा.श्री.किशोर आप्पा पाटील, यांनी पत्र दिले व चर्चा केली. यावर मंत्री महोदयांनी सकारत्मकता दाखवत लवकर पाचोरा-भडगाव मतदार संघातील सर्व कामे मार्गी लावू अशी ग्वाही दिली.