जामनेर, पाचोरा रस्त्यावर भरला गुरांचा बाजार, वरखेडी लोहारी दरम्यान वाहतूक खोळंबली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०७/२०२१
वरखेड येथील गुरांचा बाजार बंद करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी अचानकपणे काढल्यामुळे तसेच बाजर बंद असल्याबाबत जाहीर पत्रक व प्रसारमाध्यमांना माहिती देऊन जनतेपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहचवणे गरजेचे असल्यावरही फक्त एक पत्रक काढून सोशल मीडियावर टाकून वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश व निर्णय घेण्यात आला आहे.
बाजर बंद असल्याचे माहिती नसल्याने तसेच बकरी ईद असल्यामुळे ज्यांनी लाखो रुपये किंमतीचे बोकड पाळून वाढवले ते बोकड बकरी ईदच्या मुहूर्तावर विक्री न झाल्यास ते कवडीमोल होतील म्हणून व इतर अडचणी भागवण्यासाठी गुरुवारी गुरेढोरे खरेदीविक्री करणे गरजेचे असल्याने पशुपालक, गुराढोरांचे व्यापारी यांनी गुरेढोरे घेऊन वरखेडीच्या बाजारात आणली मात्र बाजार बंद असल्याने गुराढोरांच्या मालक व व्यापाऱ्यांनी जामनेर , पाचोरा रस्त्यावरच बाजार भरवून खरेदी विक्री सुरु केल्यामुळे वरखेडी बसस्थानक ते लोहारी गावाच्या जवळपासच्या जामनेर ते पाचोरा रस्त्यावर तुफान गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबली होती.
ही माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वरचे उपनिरीक्षक थोरात साहेब त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन वरखेडीत दाखल झाले मात्र कोणीही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसही हतबल झाले होते.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)