श्रेय वादाचा सारीपाट, लोहारा येथील मराठी मुलांची शाळा भुईसपाट, मात्र शाळा व्यवस्थापन समितीच्या पाठपुराव्याने, प्रश्न लागला मार्गी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारा हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावातील मतदारांची संख्याही मोठी आहे. लोहारा गावच्या मतदानामुळे जिल्हापरिषद, पंचायत समितीच काय विधानसभेला उभ्या असलेल्या उमेदवाराचे भविष्य बदलवून टाकू शकते असे हे लोहारा गाव.
लोहारा हे गाव जामनेर विधानसभा मतदारसंघात येत असलेतरी जिल्हापरिषद व पंचायत समितीचा कारभार मात्र पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या हातात असल्याने अनेक निधी मिळवून घेतांना तारेवरची कसरत करावी लागते.
लोहारा गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा गुणवत्ता व पटसंख्या बाबत जिल्हाभरातून आघाडीवर आहे या शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षणाची गुणवत्ता वाढवली परंतु या शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे मागील दोन वर्षापासून पाडण्यात आली असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या शाळेच्या इमारतीला पाडण्यापासून तर नवीन शाळाखोल्या बांधण्यासाठी निधी मिळवण्यासाठी व मिळवून देण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले व नवीन इमारत बांधकामासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही फक्त श्रेयवाद व संत्तांतराच्या फेऱ्यात या इमारतीचे बांधकाम रखडले असल्याची माहिती मिळते.
परंतु आता शालेय व्यवस्थापन समितीच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच इमारतीचे बांधकामास सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लोहारा गावचे सरपंच मा.श्री. अक्षयकुमार जैस्वाल, माजी सरपंच मा.श्री. कैलास आप्पा चौधरी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. दिपक पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली ती पुढील प्रमाणे.
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळा ही जीर्ण व धोकेदायक झाल्याने शासनाच्या आदेशानुसार गेल्या २ वर्षांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यामुळे शाळेला एकही वर्गखोली नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने मा. ना.मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,पालकमंत्री , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यासह वरिष्ठांना वारंवार निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन १०वर्गखोल्यांची मागणी केली होती.
या शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी शालेय व्यवस्थापन समितीने सतत पाठपुरावा केल्याने त्याची दखल घेत जळगांव जिल्हा परिषदेने “जिल्हा परिषद मोठी बांधकामे “या योजनेअंतर्गत लोहारा शाळेला ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार दीपक पवार व समिती सदस्य तसेच पालकवर्ग यांनी जिल्हा परिषदेचे विशेष आभार मानले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेची इमारत ६० वर्षे जुनी झालेली होती. म्हणून जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक असल्याने शासनाच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन शासनाने शाळेची नवीन इमारत बांधकाम करणेसाठी मुलभूत सुविधा २५-१५ या योजनेंतर्गत शासन निर्णय क्र.विकास–२०१९/प्र.क्र.१८०/भाग-९/योजना-६ दि.२० सप्टेंबर २०१९च्या आदेशानुसार ६० लाखांचा निधी मंजूर केला होता.मात्र राज्यात सत्ताबदल होताच विद्यमान शासनाने मुलभूत सुविधा २५-१५च्या मंजूर सर्व कामांना क्र.विकास -२०१९/प्र.क्र.२२१/यो/-६ग्रामविकास व पंचायत राज विभाग,मुंबईदि.४ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार स्थगिती दिल्याने लोहारा शाळेला मंजूर ६० लाखांच्या निधीलाही स्थगिती मिळाल्याने जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य अधांतरी झाले होते.
त्यामुळे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना लोहारा शाळेच्या बांधकामाचा प्रश्न सोडवण्यासाठी २२ फेब्रुवारी२०२० रोजी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी निवेदन दिलेले होते. त्यांनी ३१ मार्च २०२०नंतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले होते.मात्र कुठलेही हालचाल झाली नाही.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना २ नोव्हेंबर २०२० रोजी शाळेची वस्तुस्थिती मांडून तात्काळ १० वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी केली. होती.त्यावर त्यांनी तात्काळ चौकशी करून वर्गखोल्या देण्याचे आश्वासन दिले होते .मात्र तरीही काहीही हालचाल होत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी लोकशाही दिनानिमित्त १ फेब्रुवारी२०२१ रोजी पुनश्च लोहारा शाळेच्या बांधकाम संदर्भात तक्रार केली.
या तक्रारीची त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजात राऊत साहेबांनी शिक्षणाधिकारी, जळगाव यांना लोहारा शाळेसाठी किती वर्गखोल्यांची आवश्यकता आहे? तसेच प्रशासकीय मान्यता घेऊन निधीची मागणी करावी,असे आदेश दिले होते.
या सर्व पाठपुराव्याने जिल्हा परिषदेने लोहारा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून लोहारा शाळेसाठी “मोठी बांधकामे या योजनेतून”तात्काळ ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने ‘उशिरा का होईना’लोहारा शाळेचा प्रश्न मार्गी लागून शाळा व्यवस्थापन समितीच्या लढ्याला यश मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया— लोहारा शाळेचा प्रश्न जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन पाटील ,शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जळगांव भा. शि. अकलाडे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी गंभीरतेने घेत त्यांनी तात्काळ किमान ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.तसेच उर्वरित ५ खोल्यांसाठीही लवकरच निधी मंजूर करावा.शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, डॉ .केयुर चौधरी व सर्व समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन शाळाखोल्या मंजूर करुन आणल्या याबद्दल लोहारा ग्रामस्थांनी अधिकारी वर्गाचे आभार मानले आहेत.