सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या घरातून चोरी दोन लाखाचा ऐवज लंपास. (घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव.)

शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या घरातून चोरी दोन लाखाचा ऐवज लंपास. (घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव.)

By Satyajeet News
February 7, 2022
1329
0
Share:
Post Views: 102
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२२

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील अहिल्याबाई होळकर चौकात डॉ.मा.श्री. सागर गरुड यांचे घर आहे. या घराला कुलुप असल्याचे पाहून घरी कोणीही नसल्याची खात्री झाल्यावर चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधला व घरात घुसून कपाटातील ५००००/०० रुपये रोख रक्कम व चार तोळे सोने चोरुन नेल्याची घटना घडली असून शेंदुर्णी गावातील या चोरीच्या घटनेबाबत नागरिकांनी भिती व्यक्त केली असून रात्रीच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्याबाई होळकर चौकात रहात असलेले डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांचे घरी आई-वडील व सगळी मंडळी मागील चार पाच दिवसापासून पाचोरा गेलेले होते. घरी कोणीही नसल्याने त्यांनी घराला कुलूप लावले होते. या निर्मनुष्य घरावर पाळत ठेवत चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. व वरच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटात असलेले चार तोळे सोने व ५००००/०० रुपये रोख रक्कम चोरुन नेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. मा.श्री.सागर दादा गरुड व परिवार घरी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेचच पहूर पोलिसांना कळविले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली. व चोरी झालेल्या भागात कोणीही हात लावू नये अशी सुचना दिली. लगेचच जळगाव येथून श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्ञ यांच्या पथकाला पाचारण करुन कपाटावरील व इतर ठिकाणचे ठसे घेण्यात आले असून श्वान पथकाने पाचोरा नाक्यापर्यंत रस्ता दाखविला असल्याने चोरटे पुढे कदाचित वाहनातून निघून गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी मा.श्री. शिंदे करीत आहेत.

(चोरीची घटना एक मात्र तर्कवितर्क अनेक)

चोरीची घटना घडल्यापासून शेंदुर्णी नगरीत जनमानसातून अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. कारण आता शेंदुर्णी नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या निवडणुकीत डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांचे नाव प्रथम क्रमांकावर घेतले जात आहे. कारणही तसेच आहे. डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड म्हणजे आज शेंदुर्णी नगरीतील एक सच्चा समाजसेवक, सज्जनांचे मित्र तर लबाडांचे कर्दनकाळ ठरत असून ते वैद्यकीय व्यवसायातून सर्वसामान्य जनता व गोरगरीब रुग्णांसाठी ते एक देवदूत ठरत असल्याने त्यांना मुद्दामहून त्रास देण्याच्या हेतूने हा चोरीचा प्रकार घडवून आणला असावा असा अंदाज डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांनी व्यक्त केला आहे.

कारण चोरी करणारे चोरटे जर फक्त आणि फक्त चोरीचा उद्देश ठेवून चोरी करण्यासाठी घरात घुसले असते तर त्यांनी घरातील रोख रक्कम व दागदागिने चोरुन नेतांना मात्र घराच्या देव्हाऱ्यातील चांदीच्या (मौल्यवान) असलेल्या देवांच्या मुर्त्याही चोरुन नेल्या असत्या मात्र तसा काही प्रकार घडला नसून चांदीच्या देवांच्या मौल्यवान मुर्त्यांंना हातही लावलेला नसल्याने मला फक्त त्रास देण्यासाठी हा प्रकार घडला असावा अशी शंका उपस्थित केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त, जनसेवा विचारधारा ...

Next Article

विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेतील ३ आरोपींना तीन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पाचोरा शहर बसस्थानक परिसरातील देशी दारूचे दुकान शहराबाहेर हलवण्याची मागणी.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथील नाईकनगर रस्त्यावर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, मटणाच्या दुकानावर झाली तोबा गर्दी.

    April 14, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मालखेडा येथे (टोणगा) हेल्यावर अज्ञाकडून ॲसिड हल्ला, गावातील पशू प्रेमींन कडून संबधीतावर कारवाईची मागणी

    November 17, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची दारु अड्ड्यावर धडक कारवाई दिड लाख रुपयांचे रसायन नष्ट.

    June 24, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अधिकाऱ्याची बदली केली मात्र आजही जिल्हाभरात वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे सुरुच.

    December 9, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत

    चैतन्यमूर्ती कै. ना.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांची पाळधी गावातील गजाननराव गरूड पतसंस्थेत जयंती साजरी.

    October 3, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    आधार असल्यावरही निराधार असल्याचे चटके, रेशनिंग दुकानदार व ग्राहक सेवा केंद्रातून के. वाय. सी. च्या नावाखाली गरजूंची आर्थिक लूट

  • क्राईम जगत

    विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेतील ३ आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी.

  • विविध यश, निवड.

    ॲड. अविनाश सुतार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सचिव पदी निवड.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज