२१ मार्च जागतिक वन दिनानिमित्त, पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यातील वनविभागाचे आशिर्वादाने सुरु असलेल्या वृक्षतोडीची पोलखोल,
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२१
एका बाजूला शासन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी लाखो, करोडो रुपये खर्ची घालत असतांनाच दुसरीकडे पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात सगळीकडे विनापरवाना अवैधपणे दिवसाढवळ्या वृक्षतोड सुरू असून वृक्षतोडीकडे वनविभाग मुद्दामून डोळेझाक करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात असून या कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाला जागे करण्यासाठी येत्या २१ मार्च रोजी जागतिक वन दिनानिमित्त पाचोरा भडगाव तालुक्यातील सुरू असलेल्या वीरप्पनच्या पिल्लावळीचा नंगानाच व वन विभाग घेतेय लाच. या विषयावर सखोल बातमी २१ मार्च रोजी वाचायला विसरू नका
(तसेच वृक्षतोड थांबवणे व त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे कारण भविष्यात ऑक्सिजनची उणीव भासणार असून कोरोनासारख्या आजारावर आपण उपचार घेऊ शकतो मास्क विकत घेऊ शकतो परंतु ऑक्सीजन नाही ऑक्सिजनची किंमत दवाखान्यात गेल्यावर कळते तसेच ऑक्सिजन निर्मितीसाठी फुकटचा निर्मिती कारखाना म्हणजे निसर्ग निसर्गच नसेल तर तुम्ही आम्ही सुद्धा ?)