कन्नड घाटातील रस्त्याचे नुतनीकरण सुरु असल्याने चाळीसगाव (खडकी फाटा ) ते कन्नड रस्ता तात्पुरता बंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२१
काल रोजी माननीय खासदार श्री. उन्मेषदादा पाटील. यांनी चाळीसगाव खडकी फाटा ते कन्नड रस्ता कमालीचा खराब झाला असून हा घटरस्ता असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन दिनांक सात मार्च रविवारी घाट रस्ता त्वरित दुरुस्तीसाठी संबधीतांना तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सांगितले होते.
याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कन्नड घाटाच्या नुतनीकरणाचे काम तातडीने हाती घेतल्याने दिनांक आठ मार्च सोमवार रोजी कन्नडघाटाचे काम जलदगतीने सुरु असल्याने चाळीसगाव ते वाघळी दरम्यान असलेला खडकी फाटा येथे पोलीस बंदोबस्त लाऊन काम सुरु असेपर्यंत वाहनांची रहदारी नादगांव मार्गाने वळवून वाहनचालकांना माहिती पुरवण्यासाठी पोलीस अंमलदार पोलीस हअरुण बाविस्कर, पोलीस हवालदार आबा पाटील, पोलीस नाईक गणेश चव्हाण, पोलीस अंमलदार दिपक पाटील, पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील यांनी दिवसभर थांबून वाहनधारकांना योग्य मार्गदर्शन केले.
खासदार मा.श्री. उन्मेषदादा पाटील. यांनी रस्त्याची परिस्थिती जाणून घेत घाटाच्या नुतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु केल्याने तसेच खडकी फाट्यावर पोलीस तैनात करुन वाहनधारकांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल वाहनधारकांनी खासदार मा.श्री. उन्मेषदादा पाटील व पोलीसांचे आभार मानले आहेत.
(कन्नड घाट रस्त्याचे काम जलदगतीने सुरु असून हे काम रात्री उशिरापर्यंत सुरु रहाणार असल्याने वाहनधारकांनी याची दखल घेऊन आपली वाहने दुसऱ्या मार्गाने नेऊन सहकार्य करावे असे अवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.)