पत्रकारांचा अवमान करणा-या पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२१
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्ह्याच्या वतीने गृहमंत्री यांना निवेदन.*
लातूर : पत्रकारांचा अवमान व अरेरावीची भाषा करणारे कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांचे मार्फत नूकतेच देण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे, लातूर तालुका सह कोषाध्यक्ष श्रीकांत चलवाड, युवा जिल्हा उपाध्यक्ष रवी बिजलवाड, पत्रकार अमोल घायाळ, संतोष स्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुर्डूवाडी येथील अनिताताई बोराडे यांनी महिला अन्याय अत्याचार अंतर्गत महावितरण कंपनीच्या वायरमनसह अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी अर्ज दिला होता. त्याची चौकशी करण्यासाठी दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राचे पुणे विभागीय संपादक राजाराम बोराडे गेले असता त्यांना कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी अवमानकारक व अर्वाच्च भाषा वापरून अपमानीत केले आहे. अशा मग्रूर पोलीस निरीक्षकांस पदावर राहण्याचा अधिकार उरत नाही, एका वरीष्ठ पोलीस अधिका-यांने पत्रकारांचा अपमान करणे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा अवमान आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा लातूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले.