पाचोरा विभागातील डी.वाय.एस.पी. श्री. भारत काकडे साहेब व पोलीस निरीक्षक श्री. किसनराव नजन पाटील साहेब या दोघ रामलक्ष्मणाची जोडी भारी गुन्हेगारांना सुधारण्याचे काम करी.
पाचोरा शहरात गेल्या एक वर्षापासून पाचोरा विभागातील डी.वाय.एस.पी.श्री.भारत काकडे साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे डॅशिंग पोलीस निरीक्षक श्री.किसनराव नजन पाटील या दोघांची नियुक्ती झाल्यापासून गुन्हेगारांना सळो कि पळो करून सोडले आहे.
गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी सोडून चांगल्या कामाला सुरुवात केली आहे. या दोघा अधिकाऱ्यांचा समन्वय चांगला असून त्यांनी शहरात व तालुक्यात शांतता निर्माण होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था याची चोख अंमलबजावणी करून शहरात पाचोरा पोलीस स्टेशनला शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता समिती सदस्य पोलीस पाटील व्यापारी संघटना व विविध संघटना पत्रकार व ज्येष्ठ नागरिक या सर्वांना नेहमी मानसन्मान देऊन आदर करतात.
पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना मानसन्मान द्या तक्रारदार आल्यानंतर त्यांना प्रेमाची वागणूक देऊन सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या, वयोवृद्ध व्यक्ती असल्यास त्यांना बसवून अगोदर चहा पाणी देऊन त्यांचा आदर करा. त्यांचे समाधान होईल असे काम करा. शहरात चोऱ्या होणार नाही यासाठी पेट्रोलिंग दिवसा ही करा नागरिकांनाही सूचना करा. आपण आपले मौल्यवान दागिने घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे अश्या अनेक सूचना दिल्या.
कोरोना काळामध्ये माननीय श्री.भारत काकडे साहेब व श्री. किसनराव नजन पाटील साहेब यांनी रस्त्यावर येऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चारही बाजूने रस्ता ब्लॉक करून नागरिकांमध्ये जनजागृती करत बिना मास्क फिरू नका, अत्यावश्यक कामासाठीच घराचे बाहेर निघा, कामानिमित्त बाहेर निघतांना सामाजिक अंतर राखून चला, आपण सुरक्षित तर आपला परिवार सुरक्षित अश्या सूचना देत होते.
तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे धडाकेबाज अधिकारी ए.पी.आय. श्री.राहुल मोरे साहेब, श्री.दत्तात्रेय नलावडे साहेब, श्री.गणेश चोबे साहेब, श्री.विकास पाटील साहेब, सौ.पी.एस.आय.मॅडम पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम, डॉक्टर मंडळी व पाचोरा पोलीस कर्मचारी, होमगार्ड, माजी सैनिक, नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी कोरोना काळात चांगली मदत केली.
तसेच डी.वाय.एस.पी.श्री.भारत काकडे साहेब व पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांचा पोलीस खात्यातील ३५ वर्षाचा अनुभव तसेच दोघं अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, पहुर व महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन काम केले असून या कार्यकाळातील कामाच्या दांडगा अनुभवावर त्यांनी चांगल्या चांगल्या गुन्हेगारांना झटका दाखवून आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
अश्या या राम-लक्ष्मणाच्या जोडीने पाचोरा शहरासह तालुकावाशियांची मने जिंकली असून रात्रंदिवस सर्वसामान्यांना मदत करणारे व कर्तव्य पार पाडत असतांनाच कायद्याच्या चौकटीत राहून जनमासा विषयी आपुलकी ठेवणारे अधिकारी म्हणून त्यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत.
या दोघही अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर पाचोरा व तालुक्यातील जनता खुश असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*शब्दांकन-: अनिल आबा येवले*