सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›अल्टिमेटम:राज्यात यात्रा, मिरवणुका, मोर्चांना बंदी!! लोकडाऊन साठी ८ दिवसांचा अल्टिमेटम : राज्यात यात्रा, मिरवणुका, मोर्चांना बंदी!!

अल्टिमेटम:राज्यात यात्रा, मिरवणुका, मोर्चांना बंदी!! लोकडाऊन साठी ८ दिवसांचा अल्टिमेटम : राज्यात यात्रा, मिरवणुका, मोर्चांना बंदी!!

By Satyajeet News
February 22, 2021
661
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२१

मुंबई
राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्‍नाचे उत्तर येत्या आठ दिवसांत जनतेकडूनच घेणार आहे.

ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहेत, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दिनांक २१ फेब्रुवारी) रविवारी सायंकाळी जनतेशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला.

त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर समजावून सांगत असताना काही गोष्टींसाठी इशाराही दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की पूर्वी राज्यात २ ते अडीच हजार रुग्ण सापडत होते. त्यात आणखी दोन हजारांची भर पडत आहे. आज एकाच दिवसात संपूर्ण राज्यात सात हजार रुग्ण सापडले आहेत. राज्यात सध्या ५३ हजार ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या दारावर कोरोनाची दुसरी लाट धडका मारत आहे आणि ती चिंताजनक आहे.

“कोरोना योद्‌ध्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच संसर्ग आटोक्‍यात आला होता. मात्र, सगळं सुरू झालं आणि रुग्ण वाढू लागले आहेत. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा, ते उघडा असे म्हणत राहायचं, हे योग्य नाही. सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या आणि बेड याची संख्या विषम होती. मात्र, सध्याची कोरोनाची पिक पिरीयडसारखी संख्या पाहता सध्याचे बेड अपुरे पडू शकतात,त्यामुळे काही प्रमाणात बंधने घालावी लागतील,” असे ठाकरे यांनी नमूद केले.

अमरावती विभागात उद्यापासून बंधने

विदर्भातील काही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत उद्यापासून काही बंधने असणार आहेत. याबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवरील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शासकीय कार्यक्रमसुद्धा आम्ही झूम मिटिंग पद्धतीने घेणार आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले.

पक्ष वाढवा; कोरोना नाही

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आमच्याही (राजकीय) कार्यक्रमावर बंधने आणावी लागतील. सर्वच राजकीय पक्षांना मी विनंती करणार आहे. राजकीय पक्षांनीही आपल्या कार्यक्रमालाही कात्री लावावी. आपण आपले पक्ष वाढवू आणि कोरोना नाही, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

लस आल्यामुळे काही प्रमाणात शिथिलता आली. पण सध्या राज्यात कोरोना डोकं वर काढत आहे. काही देशांत सध्या लॉकडाउन सुरू आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क टाळायला हवा. नियम पाळले नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी जनतेला दिला.

“मी जबाबदार’ नवी मोहीम

मी पूर्वी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी मोहिम हाती घेतली होती. त्याचा आपल्याला फायदाही झाला. त्याच पार्श्‍वभूमीवर मी नवीन मोहीम मी जाहीर करणार आहे आणि ती “मी जबाबदार’ अशी मोहीम असेल. या मोहिमेत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझिंग करणे, या उपाय योजना कटाक्षाने पाळण्याबाबतच्या सूचना असतील. कारण नसताना गर्दी टाळूया. ऑफीसच्या वेळा विभागून करण्याची मागणी मी पंतप्रधानांकडे केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

साथ प्रतिबंधक कायद्याखाली आशिर्वाद हॉल मालकावर कारवाई.

Next Article

तोंडावर मास्क नसलेल्या वाहन धारकांना इंधन देऊ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    राज्य सरकारच्या वाईन विक्री निर्णयाविरोधात, अण्णा हजारे करणार उपोषण.

    February 5, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द येथील अनिल चौधरी यांचे अपघती निधन.

    July 21, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा आगारातील वाहक चालकांचा संकल्प जिंकू किंवा मरू, संप सुरूच असल्याने विद्यार्थ्यांची पायपीट.

    December 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मनोजच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जुगाराच्या अड्डा मालका विरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने मनोजचे कुटुंबीय हतबल.

    August 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पणची पिल्लावळ सक्रिय, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    October 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अज्ञात क्रुझरच्या धडकेत पहाण यथील ४६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.

    June 18, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे उद्या रोटरी क्लब तर्फे रस्ते सुरक्षा विषयक व्याख्यान व जनजागृती उपक्रम.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा रोटरी क्लबचे उपक्रम प्रशंसनीय प्रांतपाल रो. रमेश मेहेर.

  • ब्रेकिंग न्यूज

    खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिले पथदिवे, मात्र ठेकेदाराने उभे केले झुलते मनोरे २८ लाखाचा निधी पाण्यात.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज