कुऱ्हाड गावा साठी आनंदाची बातमी. अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे सुरू असलेले कोरोनाचे तांडव शमविण्यात ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामस्थ व आमदार गिरीश महाजन यांच्या वतीने कोरोना बाधित व मृत्यू दर कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
गेल्या आठवड्यात कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात कोरणाने अनेकांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते, या कारणाने कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही ग्रामस्थांनी गावसोडेन शेतामध्ये झाडाझुडपाखाली आपला संसार थाटला होता.
या कारणांमुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी बरिच मदत झाली. तसेच आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व जी.एम. फाउंडेशन यांच्या माध्यमातून गावात ठिकठिकाणी रॅपिड चाचणी कॅम्प राबवण्यात आली.या टेस्टमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी जळगाव येथील जी.एम. फाउंडेशन कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काहींना घरी व शेतात विलगीकरण करण्यात आले. या कारणाने मृत्यू दर व बाधितांचा दर खाली आला.तसेच गावात घरोघरी जाऊन कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी जनजागृती करुन गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आले.
या प्रयत्नांमुळे आता दोघेही गावात संक्रमण थाबले असून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व योग्य उपचार मिळाल्यामुळे बरेचसे कोरोनाबाधीत ठणठणीत होऊन घरी परतले.
याचे सर्व श्रेय ग्रामपंचायत कमिटी, आरोग्य विभाग, पोलीस पाटील ,सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना जाते कारण यांनी रात्रंदिवस लक्ष देऊन अथक परिश्रम घेतले.
तसेच आजरोजी दवाखान्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आज दुपारी गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले.
गावात कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णांनी त्यांची आपबिती कथन करत सगळ्यांनी शासन, प्रशासनाचे नियमांचे पालन करावे म्हणजे कोरोना लवकरच हद्दपार होईल असे मनोगत व्यक्त केले.