युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जोडो संपर्क अभियानाचा पाचोरा शहरातून शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१
राज्यभर सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक जोडो अभियानाची सुरुवात आज पाचोरा शहरात पाचोरा, भडगावच्या वतीने युवक मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील. प्रमुख अतिथी म्हणून व युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील तसेच युवक निरीक्षक भागवत त्यांच्या सोबत उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.दिलीपभाऊ वाघ यांनी संघटनात्मक बाबी विषयी मार्गदर्शन केले. तसेच मा.रविंद्र नाना पाटील यांनी युवक जोडो अभियानाचे महत्व पटवून दिले.
या मेळाव्याचे प्रसंगी पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री.विकास पाटील यांनी युवकांना त्याची जबाबदारी व संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करत संघटना वाढवण्यासाठी पूर्ण पाठींबा असेल असे प्रतिपादन केले. तदनंतर गौरव पाटील,अभिलाषा रोकडे,भूषण पाटील,अझर खान,हर्षल पाटील,अमोल भागवत,दीपक पाटील, इत्यादींनी पक्ष बळकटी करीता आपली भूमिका मांडली.
या भव्य मेळाव्याचे प्रसंगी व्यासपीठावर मा.दिलीपभाऊ वाघ,मा.संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील,विनय बाबा जकातदार,प्रा.भागवत महालपुरे, रणजित पाटील,विजय कडू पाटील,भोला चौधरी, भडगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष भाऊ जाधव,पाचोरा शहराध्यक्ष अझर खान,रझ्याक बागवान,सत्तार पिंजारी,हर्षल पाटील, राहुल पाटील,स्वप्नील पाटील,शाळीग्राम मालकर,अविनाश पाटील,पिंटू भामरे,अभिजित पवार,पंकज गढरी, अरुण सोनवणे, विनोद हिरामण पाटील स्वदेश पाटील,बाबाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच उमेश एरंडे, सचिन शिंदे, गोपी पाटील,अरुण पाटील,गौरव शिरसाठ, हेमंत पाटील,रवी राठोड,प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील,संतोष महाजन,सुनील पाटील,कुणाल पाटील,राजेंद्र साळुंखे,देवेंद्र चव्हाण,समाधान पाटील,दीपक प्रेमराज पाटील,पिंटू पाटील,योगेश सूर्यवंशी, गुलाब पाटील,विवेक पवार,आदी शेकडो पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.