स्व.पंजाबराव उर्फ (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार सोहळा वितरण संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२१
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वर्गवासी पंजाबराव उर्फ (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधुन दिनांक ३ जानेवारी रविवार रोजी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार बंधूंना पुरस्काराचे वितरण सुद्धा करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळ्यात तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार म्हणून अजिंक्य भारतचे प्रतिनिधी मंगेश राजनकार , एम.सी.एन.चे अर्शद इकबाल , RC24 न्यूज चे जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत , तरुण भारतचे प्रतिनिधी अमोल भगत , दैनिक लोकमतचे संतोष मांजरे , दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी कैलास मोरखडे या पत्रकार बंधूंना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरावबापू उर्फ बाळासाहेब देशमुख तर प्रमुख पाहुणे प्रतिष्ठानचे सचिनबापू देशमुख भाजयुमो बुलढाणा जिल्हा अध्यक्ष , विशेष उपस्थिती , अभिमन्यजी भगत जेष्ठ पत्रकार , माजी नगरसेवक कैलास डोबे , नगरसेवक नीलेश शर्मा , शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भाऊ काळपांडे , अशोकराव टावरी उपस्थिती होती प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासबापू देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय देशमुख यांनी मानले.
तसेच मंचावरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील पत्रकार बांधवांचा स्व: पंजाबराव उर्फ(नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने सर्व पत्रकारबंधुचा डायरी , पेन , बहुजन चळवळ दिनदर्शिका , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला जळगाव जामोद तालुक्यातील नानासाहेब कांडलकर , देविदास तायडे , जयदेव वानखडे , डॉ. गुलाबराव इंगळे , अश्विन राजपूत , राजकुमार भड ,गणेश भड, आकाश उमाळे , राजेश वाढे , राजेश बाठे , दत्तु दांडगे असंख्य पत्रकार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्वर्गवासी पंजाबराव उर्फ (नानाबापू )देशमुख स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याला covid-19 तिच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.