गरीबाच्या भाजीची फोडणी करपली , खाद्यतेलाचे भाव गगनाला. वहा रे सरकार तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
गोडेतेल म्हणजेच खाद्यतेलाचे तेलाचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरच्या भाजीची फोडणी करपली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सद्या बाजारात सोयाबीन तेल १३०/०० रुपये व शेंगदाणा तेल १६५/०० रुपये किलो भाव आहे. मोलमजुरी करुन हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांना या भावाने तेल घेणे परवडणारे नसल्याने सद्यातरी त्यांच्या घरातील भाजीला फोडणी देणे थांबले आहे.
पेट्रोल, डीझेलचे भाव थोडे जरी वाढले तरी श्रीमंत लगेचच बोंबाबोंब करतात व शासनही त्वरित दखल घेते आंदोलने छेडली जातात परंतु दुसरीकडे भाकरीसोबत चटणी खावून दिवस काढायचे म्हटले तरी खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ते शक्य होणार नाही.
तरी शासनाने जिवनावश्यक असलेल्या तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी साठेबाजी करणारांवर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.