सहनही होत नाही व सांगताही येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुख्यध्यापकांचा खो.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२१
सहनही होत नाही व सांगताही येत नाही.असाच काहीसा प्रकार शिक्षणविभागत सुरु असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला खो देत काही शाळांचे मुख्याध्यापक मनमानी करत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पहावयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अशी की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य तिसरी लाटेचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, जिल्हाधिकारी जळगांव यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची पन्नास टक्के उपस्तिथी असावी असे आदेश काढले आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापकांनी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला खो देत त्यांचे आदेश झुगारत शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती बाबत भाग पाडत असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरूच ठेवल्याचे चित्र आहे.
जळगांव जिल्ह्यात २५ जुन २०२१ रोजी कोविड १९- प्रतिबंधात्मक् उपाय म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शाळा महाविद्यालये पूर्ण बंद व ऑनलाईन शिक्षण तसेच कर्मचारी उपस्तिथी ५०% असावी असे आदेश निर्गमित केले आहेत.मात्र तरी देखील काही मुख्याध्यापक् शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांना पूर्ण उपस्तिथी सह शाळेत जुन महिन्यापासून पूर्ण वेळ बोलवत आहेत. अशी माहिती अनेक शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी नावे गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेर् कर्मचारी यांना कोणतेही विमा संरक्षण नसतांना काही मुख्याध्यापक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून विद्यार्थी नसतांना देखील शाळेत बोलवत आहेत.
अशा मनमानी कारभार करणाऱ्या मुख्यध्यापकांना प्रशासन काय कारवाई करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.