शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नामांकित शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन काल दिनांक १३ जानेवारी २०२४ शनिवार रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध विषयांवरील जनजागृती सह वेगवेगळ्या मनोरंजक गीत व नृत्य सादर करत धम्माल मौजमस्ती करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या स्नेहसंमेलनाची सुरवात महाराष्ट्र शासन निर्मीती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन, सरस्वती पूजन व सरस्वती वंदना व गणेश वंदना सादर करुन करण्यात आली. तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, सहकार नेते सतीश बापू शिंदे, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल भाऊ शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष निरज मुनोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, संस्थेच्या सी. ई. ओ. पूजाताई शिंदे, माजी पंचायत समिती सभापती बंसिलाल पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील या उपस्थित मान्यवरांचे संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तदनंतर प्रा. शिवाजी शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेतर्फे दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलेमुली आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करतात व यातूनच त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे मत प्रा. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच अमोल भाऊ शिंदे यांनी विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. यावेळी मंचावर उपस्थित असलेले व कार्यक्रमाचे उध्दघाटक डॉ. शामकांत देवरे यांनी विद्यार्थी व या विद्यार्थ्यांना घडवून घेत उपक्रम राबवून घेणाऱ्या शिक्षकांचे, पालकवर्गाचे व उपक्रमांचे कौतुक केले.
नाही
सुमारे चार तास चाललेल्या या स्नेहसंमेलनाच्या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी अफझलखानाचा वध, झाडे लावा, झाडे जगवा, चंद्रयान ३, नारीशक्ती हीच महान शक्ती, प्लॅस्टिक बंदी, हिंदू, मुस्लिम एकता, राष्ट्रीय एकात्मता, शेती व शेतकरी यांच्यावर आधारित मराठी व हिंदी चित्रपटातील गीतांचे जनजागृती पर उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच बालगीत, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक गीतांवर नृत्य सादर करत १०५० विद्यार्थ्यांनी उत्सस्फूर्तपणे हभाग नोंदवला.तसेच संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या जीवन परिचयावरील चित्रफीती दाखवण्यात आली.
या स्नेहसंमेलनाच्या सादरीकरणात विशेष बाब म्हणजे शिंदे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून केलेले सुत्रसंचलन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले असून याव्दारे “भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षणासोबतच अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास” असलेले ब्रीदवाक्य सार्थ ठरले. या कार्यक्रमासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनाला मोहसीन शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.