पाचोरा येथे लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२१
पाचोरा येथील गांधी चौक परिसरात नानासाहेब देवरे यांच्या सौजन्याने श्री. सराफ बाजार मित्र मंडळ, सोनार गल्ली मित्र मंडळ, सुवर्णकार महिला मंडळ आणि राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटन जळगाव, शाखा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
याप्रसंगी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. अभिवादन करण्यात येवून मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नानासाहेब देवरे, राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनच्या जिल्हाध्यक्ष ललिता पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष सरला पाटील, उपाध्यक्ष वैशाली बोरकर, सचिव वैशाली, जडे जनसंपर्क प्रमुख डॉ. अंजली गवांदे, प्रसिद्धीप्रमुख डॉ. अनुजा तावरे , सदस्य सुनिता देवरे आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.