एस.टी.सेवा बंद, रस्ते खराब तरीही, कुऱ्हाड येथील सावित्रीच्या लेकींचा शिक्षणासाठी संघर्ष.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२१
एस.टी.सेवा व पी.जे.रेल्वे बंद असल्याने तसेच कुऱ्हाड ते वरखेडी ह्या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरचे डांबर मागील दिड वर्षांपासून गायब झाल्यामुळे रस्ताच शिल्लक राहिलेला नसल्याने पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील विद्यार्थ्यांचे विशेष करून विद्यार्थ्यांनींचे शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी अत्यंत हाल होत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक व कुऱ्हाड खुर्द ही दोघी गावे मिळून या गावातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पैकी ३० च्या जवळपास विद्यार्थ्यांनी संख्या आहेत. हे विद्यार्थी व विद्यार्थिनी कुऱ्हाड येथून शेंदुर्णी येथे दररोज सोळा किलोमीटर जाणे व परत येणे असा ३२ किलोमीटरचा प्रवास करत शिक्षण घेण्यासाठी धडपड करत आहेत. कारण कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील वर्षी शाळा, कॉलेज बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
जेमतेम शाळा, कॉलेज सुरु झाले परंतु एस.टी.चा संप सुरू झाल्यापासून एस.टी.सेवा बंद व त्यातल्यात्यात पी.जे.रेल्वे बंद असल्याने कुऱ्हाड येथील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यातच दुष्काळात तेरावा महिना या म्हणी प्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना शेंदुर्णी येथील शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी कुऱ्हाड ते वरखेडी हा पाच किलोमीटरचा मार्ग पायी किंवा सायकलने पार करावा लागतो. परंतु या रस्त्यावर मागील दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून डांबर शिल्लक राहिलेले नाही. या रस्त्यावर संपूर्ण खड्डे व दगडगोटे असल्याने सायकल चालवणे काय परंतु पायी चालणे मुश्कील झाले आहे.
तरीही हे विद्यार्थी ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता कुऱ्हाड ते वरखेडी रस्ता मार्गक्रमण करतात. परंतु वरखेडी येथे आल्यानंतर एस.टी सेवा व पी.जे.रेल्वे बंद असल्याने मिळेल त्या खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. तसेच ही खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने वेळेवर तर नसतात म्हणून तासंतास ताटकळत उभे रहावे लागते. वेळेवर शाळा, कॉलेजमध्ये जाता येत नसल्याने एक,दोन तासिकांचा आभ्यास बूडतो व शैक्षणिक नुकसान होते.
तसेच हा प्रवास करतांना खाजगी वाहनातून खूपच जिकिरीचे होते. कारण रस्त्यावर प्रवासी संख्या जास्त असल्याने ह्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे चालक व मालक त्यांच्या गाडीमध्ये भरगच्च प्रवासी भरून गाड्या चालवतात. यामुळे मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच वेळेवर प्रवासाची साधनं मिळत असल्याने शाळा कॉलेजमध्ये जातांना किंवा येतांना तासंतास ताटकळत बसावे लागते. या कारणास्तव विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण करणे, वेळेवर घरी जाणे जमत नसल्याने शारीरिक त्रास होत असतो, सोबतच शैक्षणिक नुकसान होते सोबतच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी लवकरात लवकर एस.टी.बस व पी.जे.रेल्वे सुरू करून तसेच कुऱ्हाड ते वरखेडी रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करुन आमच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी कुऱ्हाड विद्यार्थिनींनी केली आहे.