डॉ. योगिता चौधरी यांची विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ सदस्य पदी नियुक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२३
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ यातील तरतुदीनुसार महाविद्यालय, परिसंस्था व विद्यापीठ विभाग यामधील विद्यार्थ्यांची विविध सांस्कृतिक व कल्याण कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी व त्याचे अवेक्षण करण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळ याची रचना केली जाते. माननीय कुलगुरू महोदय आणि संचालक, विद्यार्थी विकास यांच्या नामनिर्देशानुसार अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथे वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. योगिता चौधरी यांची सन ऑगस्ट २०२७ पर्यंत म्हणजेच पाच वर्षांसाठी विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत राज्यस्तरावर दोन वेळा पारितोषिक प्राप्त केलेली आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर अन्वेषण या संशोधन स्पर्धेत मेंटॉर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ज्यात महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे उपक्रम, कार्यक्रम आणि स्पर्धा यात सहभागी होऊन युवारंग, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, मेस्ट्रो स्पर्धा यात विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
नुकताच उत्तुंग भरारी हा पुरस्कार त्यांना आदर्श शैक्षणिक समूह यांच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या नियुक्तीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड, संस्थेचे सचिव श्री. सतीशजी काशीद, संस्थेच्या संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, संस्थेचे सहसचिव श्री. दीपकभाऊ गरुड, वस्तीगृह सचिव श्री. कैलासभाऊ देशमुख, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शाम साळुंखे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.