२८ वर्षीय महिला अचानक बेपत्ता, पाचोरा पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील सासर असलेली एक २८ वर्षीय विवाहित महिला दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुकवार पासून पाचोरा तालुक्यातील लोहटार येथून बेपत्ता झाली असल्याची खबर महिलेचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिली असून या खबरीवरुन संबंधित महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. एका बाजूला महिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला तरीही महिलेचा शोध लागत नसून बेपत्ता झालेल्या महिलेचे पती व सासरे यांना एक अज्ञात भ्रमणध्वनीवरुन सतत फोन येत असून संबंधित इसम फोनवरुन सासरच्या मंडळींना धमकावत असल्याने हे कुटुंब हवालदिल झाले असून दहशतीखाली आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की लोहटार येथील दिलीप मोहन परदेशी यांची मुलगी खुशी उर्फ (सुवर्णा) हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील रवींद्र बुधेसिंग परदेशी याच्या सोबत समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे झालेला आहे. खुशी व रवींद्र यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर वंश व हर्षल या मुलांच्या रुपाने दोन चिमुकली फुले फुलली आहेत. रवींद्र हा मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे. यातच सौ. खुशी हिला काही दिवस लोहटार येथे माहेरी जायचे होते म्हणून एस.टी. सेवा बंद असल्याकारणाने खुशीचा पती रवींद्र याने स्वताच्या दुचाकीवरून खुशीला दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी लोहटार येथे पोहचते करून रवींद्र डांभुर्णी येथे आपल्या घरी परतला होता.
परंतु दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवारी सासरवाडीहून फोन आला व खुशी डांभुर्णी येथे आली आहे का ? अशी विचारणा करण्यात आली होती. परंतु खुशी लोहटार येथून बेपत्ता झाली व ती सासरवाडीलाही नसल्याचे माहीत झाल्यावर माहेरच्या व सासरच्या लोकांनी खुशीचा शोध घेण्यासाठी गावोगावी जाऊन व नातलगांना फोन करुन तपास केला मात्र खुशीचा तपास लागत नसल्याने दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी खुशीचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला खुशी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
सौ. खुशी ही मागील एक महिन्यापासून लोहटार येथून बेपत्ता झाली असून पोलिस तीचा शोध घेत आहेत. परंतु अद्यापही थांगपत्ता लागल नसल्याने सौ. खुशीच्या माहेरची व सासरची मंडळी हवालदिल झाली असून सौ. आपल्याला परीने सौ. खुशीचा शोध घेत आहेत. परंतु एका बाजूला खुशी हरवल्यापासून तिची शोधाशोध सुरु असतांनाच दुसरीकडे मात्र सौ. खुशीच्या पतीला व सासरच्या मंडळीला एका भ्रमणध्वनीवरुन धमक्या येत असल्याने डांभुर्णी येथील रवींद्र बुधेसिंग परदेशी याचे कुटुंब हवालदिल झाले असून दहशतीखाली जगत आहे. तसेच रवींद्र बुधेसिंग परदेशी हे फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात लवकरच पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे सौ. खुशीचे सासरे बुधेसिंग परदेशी यांनी सांगितले आहे.
सुचना~फोटोतील संबंधित महिला कुठेही आढळून आल्यास पाचोरा पोलिस स्टेशन किंवा ७८२३०३५०८० या क्रमांकावर कळवावे असे अवाहन मुलीच्या वडीलांनी केले आहे.